सावली तालुक्यातील कोंडेखल येथील नवीन नाली चे बांधकाम निकृष्ट दर्जाचे. ★ जा कुणाला तक्रार करतेस तर कर जिल्हा परिषद शाखा अभियंत्याचे ग्रामपंचायत सदस्याला उद्धट उत्तर...?


सावली तालुक्यातील कोंडेखल येथील नवीन नाली चे बांधकाम निकृष्ट दर्जाचे.

★ जा कुणाला तक्रार करतेस तर कर जिल्हा परिषद शाखा अभियंत्याचे ग्रामपंचायत सदस्याला उद्धट उत्तर...?

   

एस.के.24 तास


सावली : तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय कोंडेखल येथील दलित वस्ती सुधार योजनेच्या योजना अंतर्गत नवीन नालीचे बांधकाम सुरू असून ते योग्य नसल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य रोशन वालदे यांच्या कडे काही ग्रामस्थांनी केली. नालीच्या बांधकामाची पाहणी ग्रामपंचायत सदस्य रोषण वालदे यांनी केली असता ते निकृष्ट दर्जाचे आहे असे लक्षात आले.



त्यामुळे त्यांनी ग्रामपंचायत उपसरपंच,नरेश बाबनवाडे सचिव.ए. एस.देवगडे व जिल्हा परिषद बांधकाम शाखा अभियंता गायकवाड यांना या संदर्भात माहिती दिली व विचारणा केली. असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत कोणाकडे तक्रार करायची असेल तर करून घ्या आम्ही कोणाला घाबरत नाही असे उत्तर दिले व नालीचा निकृष्ट दर्जाचं काम सुरू ठेवले आहेत. 

गावांमध्ये चांगली कामे झाली पाहिजे हाच उद्देश असताना सचिव अभियंता ही मिलीभगत कामे थातूरमातूर करीत असल्याचे दिसत असून चांगल्या पद्धतीने कामे करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य रोषण वालदे यांनी केली असून अशा मजूर कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पत्र पंचायत समितीचे सभापती,विजय कोरेवार यांच्याकडे केली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !