युवकांनो बिरसा मुंडा सारखे लढवय्ये व्हा- शिवराम गिऱ्हेपुंजे ★ बिरसा मुंडा जयंती रॅली काढून, ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक नृत्याने केली साजरी.


युवकांनो बिरसा मुंडा सारखे लढवय्ये व्हा- शिवराम गिऱ्हेपुंजे


★ बिरसा मुंडा जयंती रॅली काढून, ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक नृत्याने केली साजरी.


एस.के.24 तास


भंडारा : तालुक्यातील जंगली गराडा येथे आदिवासी समाजाने क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती रॅली काढून, ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक नृत्याने साजरी केली. आदिवासी समाज दरवर्षी १५ नोव्हेंबरला बिरसा मुंडा जयंती साजरी करतो. हा दिवस केंद्र सरकारने जनजाती गौरव दिवस म्हणून साजरे करण्यास सुरवात केली. भारताच्या भूमीवर असे अनेक क्रांतिकारक आणि आंदोलक जन्माला आले आहेत, ज्यांनी स्वतःच्या बळावर ब्रिटिश सरकारला हरभरा चघळायला भाग पाडले. असाच एक नायक होता बिरसा मुंडा. धर्मांतर, शोषण आणि अन्यायाविरुद्ध सशस्त्र क्रांती करणारे महान सेनापती बिरसा मुंडा यांची जयंती आहे. आदिवासींना संघटित करून ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढा देणाऱ्या महान क्रांतिकारकांमध्ये बिरसा मुंडा यांची गणना होते. युवकांनो बिरसा मुंडा सारखे लढवय्ये व्हा आणि देशाची सेवा करा. असे विचार जंगली गराडा येथील बिरसा मुंडा जयंती प्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक शिवराम गिऱ्हेपुंजे यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यांचे अनावरण करण्यात आले यावेळी मंचावर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र निंबार्ते, तालुका अध्यक्ष विनोद बांते, बालुभाऊ मस्के, सरपंच सौ संध्याताई निंबार्ते, उपसरपंच सौ श्यामकाला उईके, टेकराम पडोळे, नीलकंठ कायते, ओमप्रकाश गिऱ्हेपुंजे, भीमराव शेंद्रे आदी उपस्थित होते.


      झारखंड राज्यात रांचीच्या ऊलीहातू गावात सुगना मुंडा व करमी हातू यांच्यापोटी १५ नोव्हेंबर १८७५ रोजी बिरसा मुंडा यांचा जन्म झाला. इंग्रजी शाळेत शिक्षण घेतलेल्या बिरसा यांना आदिवासी समाजाबद्दल आपुलकी होती. इंग्रज आपल्या समाजावर अन्याय करीत आहेत, अशी त्यांची भावना होती. त्यातून त्यांनी आदिवासी समाजातील लढवय्या युवकांना एकत्र करून इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले. १८९७ ते १९०० या काळात इंग्रज सैनिक व आदिवासी यांच्यात युद्ध झाले. त्याचे नेतृत्व बिरसा मुंडा यांच्याकडे होते. आदिवासी बिरसा यास धरती बाबा या नावाने ओळखले जात होते. ३ फेब्रुवारी १९०० रोजी बिरसा व त्यांच्या साथीदारांना अटक झाली. रांची येथील कारागृहात ९ जून १९०० रोजी बिरसा मुंडांचे निधन झाले. तेव्हापासून बिरसा मुंडा यांची जयंती साजरी के ली जाते. अशी माहिती मान्यवरांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन नितेश गोंधुळे यांनी तर आभार प्रदर्शन भीमराव शेंद्रे यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी नकटुजी मडावी, भिवा मडावी, शिवराम पुसामे, देवदास पुसामे, विनोद कोकोडे, रामजी मडावी, राजू सयाम, नामदेव निंबार्ते, मिलिंद दरवरे, सुभाष टेकाम, उर्मिलाताई चाचेरे, सुनील वरकडे, लेकराम कोर्राम, महेश टेटे, गंगाराम गिऱ्हेपुंजे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !