मोटर सायकल पाटात पडून २ युवकांचा मृत्यू.
★ मोगरा इतर जिल्हा मार्गावरील घटना.
★ लाखनी पोलिसांनी केली आकस्मित मृत्युची नोंद.
एस.के.24 तास
लाखनी : शिवनीबांध (साकोली) वरुण स्वगावाकडे गावी परत येत असताना,चालकाचे संतुलन बिघडुन मोटरसायकल पाटात पडल्याने दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना पिंपळगाव पालांदूर इतर जिल्हा मार्गावरील मोगरा नाग मंदिराजवळ शनिवारी (ता. २०) सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. राकेश केवळराम देशमुख (३०) आणि महेश जगदीश कामथे (३२ ) दोघेही रा. रेंगेपार (कोहळी) ता. लाखनी अशी मृतकांची नावे असून लाखनी पोलिसांनी आकस्मित मृत्युची नोंद केली आहे.
तालुक्यातील रेंगेपार (कोहळी) येथील महेश कामथे यांची बहीण भाऊबिजेनिमित्त ओवाळनीला आली नाही म्हणून महेश हा त्याचा मित्र राकेश देशमुख सोबत दोघेही शुक्रवारी (ता. १९) ला साकोली तालुक्यातील शिवनीबांध येथे टीव्हीएस स्टार सिटी मोटर सायकल क्र. एमएच ३६ सी ४८९२ ने बहिणीच्या घरी ओवाळणी करिता गेले होते. भाऊबिजेची ओवाळणी करुन सायंकाळी मोटरसायकलने शिवनीबांध येथून निघून सानगडी येथे गेले. तिथे आठवडी बाजार करून भुगावमार्गे स्वगावाकडे परत येत असताना मोगरा नाग मंदिराजवळ चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या पाटात दोघेही मोटरसायकलसह पडले . रात्रीची वेळ असल्याने कुणालाही अपघाताची माहिती मिळाली नाही. दोघेही रात्रभर नालीत पडून राहिल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. शनिवारी (ता. २०) ला सकाळच्या सुमारास काही नागरिक फिरण्यासाठी नाग मंदीराकडे गेले असता ही घटना त्यांच्या लक्षात आली. व भ्रमणध्वनी द्वारे लाखनी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून वेळ न दवडता पोलिस निरीक्षक मनोज वाडिवे, पोलिस हवालदार दिगांबर तलमले,जतिन दासानी पोलिस शिपाई नितिन बोरकर यांनी घटनास्थळ गाठले सामाजिक कार्यकर्ता रमेश खेडकर व नागरिकांच्या मदतीने मृतदेह व मोटर सायकल पाटाबाहेर काढण्यात आले व उत्तरीय परीक्षणाकरिता ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे पाठविण्यात आले.
केवळराम देशमुख यांच्या फिर्यादीवरुण लाखनी पोलिसांनी आकस्मित मृत्युची नोंद केली. शव परीक्षणानंतर मृतदेह नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आले. स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गावातून एकाच वेळी २ युवकांच्या अर्थी निघल्याने गावावर शोककळा पसरली. कलम १७४ सीआरपीसी नुसार घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय कोरचे करीत आहेत.
मृतक महेश कामथे याचे २ वर्षापूर्वी लग्न झाले असून त्याला ७ दिवसाचा नवजात बालक आहे.