बेरंग झालेली "मंडई "आदिवासींचे गाेंडी नृत्याने रंगली.


 बेरंग झालेली "मंडई "आदिवासींचे गाेंडी  नृत्याने रंगली.


एस.के.24 तास


नागभिड : स्थानिक लाेककला दुरापास्त झालेली मंडई बेरंग व बेजान होऊ घातल्या असता नाच आदिवासीं क्षेत्रातील युवा युवतीनी नवेगाव पांडव येथील मंडई मध्ये गाेंडी नृत्याने नवा रंग भरल्याचे काैतुकास्पद चित्र बघायलास मिळाले. 

दिवाळीच्या पर्वावर,भाऊबीजेला नागभिड तालुक्यातील  नवेगाव पांडव येथे मंडई भरविण्याची फार जुनी प्रथा आहे.या दिवसी गावाला जत्रेचे रुप येत असते.गावातील व परिसरातील शेतकरी खरीप हंगामात 5-6 महिने काबाडकष्ट करतात व शेतकामात व्यस्त राहतात. दिवाळीचे काळात धान पिकाची सुगी होऊन शेतकऱ्याचे हातात चार पैसे येतात व थोडी उसंत मिलते. या उसंतीचे काळात मंडई, नाटक, दंडारी, पट, जत्रा, झुंज असे कार्यक्रम घेण्याच्या जुन्या परंपरा कायम आहेत.  यातून  लोक कलांचे सादरीकरण,  मनोरंजनासह  स्थानिक कलांचे जतन, ग्रामीण व्यवसाय, नातेसंबंधनाची बांधिलकी व समाज एकोपा हे कार्य साध्य होतात. मात्र गेल्या एक तपापासून लोककलांबाबत वाढलेली अनास्था,इतिहास/जमा होऊ घातलेल्या परंपरा,आधुनिकतेच्या ओघात ओसरलेला उत्साह पुढयात असला तरी नवेगाव पांडव या गावाने आपली मंडईची फार जुनी परंपरा आजही जोपासली आहे  मात्र काळानुरूप जुन्या कला व प्रथा मागे पडून व नामशेष होऊन त्याजागी मनोरंजनाची नवी साधने प्रस्थापित झाली आहेत. 

        जुन्या पारंपरिक कलांना प्रोत्साहन व चालना देऊन पुनरज्जिवीत करण्याची निकड असल्याची भावना   ग्रामस्थांनी व्यक्त करून त्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील आदिवासी बांधवानी हजारो वर्ष जपलेल्या गोंडी नृत्य कलेचे सादरीकरन कार्यक़माचे आयोजन मंडईनिमित्य गावात करण्यात आले. 

सादर पारंपरिक नृत्य कलेचे सादरीकरण गडचिरोली जिल्ह्यातील छत्तीसगढ सीमावर्ती भागातील झाडापापडा इलाक्यातील मोहगांव,जवेली,हलकंहार, कन्हेली व अन्य गावांतील आदिवासी युवक युवतीनी  झाडापापडा परिसरातील 23 गावांचे संयुक्त गाव गणराज्य ग्रामसभा परिषद या आदिवासीचे परंपरा, संस्कृती, उपजीविका व अधिकार यासाठी कार्यरत पेसा अंतर्गत स्थापित संस्थेच्या वतीने विनामोबदला फक्त गोंडी संस्कृती दर्शन होण्याचे उद्देशाने केले.

 सादर कार्यक्रमाचे आयोजनाकरीता  संस्थेचे अध्यक्ष,देवसाय आतला,बावसू पावे,रैनू बोगा, देऊ टेकाम,बरसाय दुगा,रा.मोहागांव व नवेगाव पांडव येथील आदिवासी क्षेत्रात शासकीय सेवेत कार्यरत युवक दिनेश पानसे यांनी पुढाकार घेतला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !