माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती मुल तालुकाध्यक्ष पदी,संदीप तेलंग व नितेश मॅकलवार यांची सचिव पदी नियुक्ती.

माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती मुल तालुकाध्यक्ष पदी,संदीप तेलंग व नितेश मॅकलवार यांची सचिव पदी नियुक्ती.      


           एस.के.24 तास

            

मुल : भारत सरकार नोंदणीकृत माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण आणि पोलिस मित्र फाउंडेशन अंतर्गत माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचा मुल तालुका अध्यक्षपदी श्री संदीप तेलंग व सचिव पदी नितेश मॅकलवार तसेच उपाध्यक्ष म्हणून संजय मेकरतिवर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.                   

संदीप रामनाथ तेलंग हे विदर्भ माझा न्यूज 24 चे मुल तालुका प्रतिनिधी आहेत, त्यांचे कार्य पाहता माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री महेश सारणीकर, महाराष्ट्र राज्य मुख्य सचिव श्री. इद्रीस सिद्दिकी, विदर्भ विभाग कार्याध्यक्ष श्री योगेश मुहेरकर, जिल्हाध्यक्ष गौतम कांबळे यानी श्री संदीप रामनाथ तेलंग यांची मुल तालुका अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. समस्त माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी श्री संदिप तेलंग यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तालुका अध्यक्ष श्री संदीप  तेलंग यांनी वरिष्ठांचे आभार मानले.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !