कोरबा यशवंतपुर व चेन्नई बिलासपुर जल्द ट्रेन मुल रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात यावे. खासदार बाळुभाऊ धानोरकर यांच्याकडे निवेदनात मागणी.नगरसेविका सौ,ललिता सुरेश फुलझेले

कोरबा यशवंतपुर व चेन्नई बिलासपुर जल्द ट्रेन मुल रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात यावे. खासदार बाळुभाऊ धानोरकर यांच्याकडे निवेदनात मागणी.नगरसेविका सौ,ललिता सुरेश फुलझेले

एस.के.24 तास

मुल : रेल्वे स्टेशन मूलवरून जलद गतीने धावणारी कोरवा- यशवंतपुर व चेन्नई- बिलासपुर रेल्वेगाडी यापूर्वी मुल रेल्वेस्थानकावर थांबत होती कोरोना संकटानंतर ही ट्रेन बंद झाली त्यानंतर काही महिन्यापासून ही ट्रेन सुरु झाली मात्र मुल रेल्वे स्थानकावर थांबा नसल्यामुळे येथून रायपुर, गोंदिया, चेन्नई ,या शहराकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांना व व्यापाऱ्यांना लांबचे अंतर गाठून या शहराकडे जावे लागत आहे. मुलशहर हे राईस मिल चे औद्योगिक शहर म्हणून महाराष्ट्रात व लगतच्या राज्यात प्रसिद्ध आहे या घटकाशी निगडित मशिनरी इंजिनिअर ऑपरेटर युपी, बिहार, छत्तीसगड या राज्यातून उपजीविकेसाठी येणारा मजूर वर्ग मुलमध्ये भरपूर प्रमाणात राहतात येथून त्यांना त्यांच्या घरी परराज्यात जाण्यासाठी फक्त ही एकमेव ट्रेन आहे तसेच इतर व्यापारी गोंदिया, छत्तीसगड येथे व्यापारी खरेदी विक्रीसाठी दैनंदिन येणे-जाणे करीत असताना त्यांना या रेल्वे थांबा मिळाल्यास फार सोयीचे होईल. मूल नगरात औद्योगिक वाढ करायची असल्यास या ट्रेंडमुळे उत्पादन वाढवणारे व्यवसाय येण्यास तयार होईल. त्यामुळे भरपूर रोजगार निर्मिती होऊन बेरोजगारांना काम मिळून उदरनिर्वाह मदत होईल. या सर्व बाबीचा विचार करून रेल्वे प्रशासनकडे पाठपुरावा करून उपकृत करावे. अशी मागणी खासदार बाळु भाऊ धानोरकर यांच्याकडे सौ ललिता फुलझेले नगरसेविका यांनी केलेली असून लवकरच मागणीची पूर्तता केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले निवेदन देताना याप्रसंगी सीडीसीसी बैंकचे अध्यक्ष श्री.सन्तोषभाऊ रावत,मुल तालुका काँग्रेस अध्यक्ष श्री घनश्याम येनुरकर , संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष श्री राकेश रत्नावार महिला काँग्रेस अध्यक्ष रूपालीताई संतोषवार, मुल शहराध्यक्ष सुनील शेरकी, शहर किसान सेलचे अध्यक्ष गुरूदास चौधरी,किशोर घडसे, कार्याध्यक्ष श्री कैलास चलाख ,शहर उपाध्यक्ष श्री संदीप मोहबे, श्री सुरेश फुलझेले, शहर कोषाध्यक्ष दिनेश जिद्दीवार, चंद्रकांत चतारे ,संतोष वाढई,गौतम जीवने, आशिष रामटेके, रंजीत अकुलवार,बंडू नॉर्मलवार व अन्य काँग्रेस कार्यकर्ता उपस्थित होते.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !