महात्मा गांधींकडे पर्यावरण योद्धा म्हणून बघा : खासदार बाळू भाऊ धानोरकर

महात्मा गांधींकडे पर्यावरण योद्धा म्हणून बघा : खासदार बाळू भाऊ धानोरकर


नितेश मँकलवार!कार्यकारी संपादक!एस.के.24तास

चंद्रपूर : हिंसाचाराची भावना संपूर्ण जैवविश्वासाठी विनाशकारी आहे. अशा परिस्थितीत आपण प्रथम महात्मा गांधींचे मूलभूत विचार आणि जीवनशैली लक्षात ठेवत आपण गांधीजींना पर्यावरण योद्धा म्हणून पाहण्याची गरज आहे. कारण त्यांच्या विचारधारेमध्ये निसर्गवादी विचार आहे. असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. ते पर्यावरण संवर्धन व विकास समिती तर्फे आयोजित  पर्यावरण सम्मेलन २०२१ या कार्यक्रमात बोलत होते. 

या वेळी आमदार,किशोर जोरगेवार,जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,राजेंद्र वैद्य,विधान सभेचे माजी उपसभापती,मोरेश्वर टेमुर्डे,प्रदेश अध्यक्ष,ओबीसी सेल ईश्वर बाळबुधे,डी.के. आरीकर, प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ऍड. हिराचंद्र बोरकुटे,महिला विंग जिल्हा अध्यक्ष, बेबीताई उईके,शहर अध्यक्ष,महिला विंग ज्योती रंगारी, राजेश सोलापण,हरीश ससनकर,शालिनी महाकुलकर,वर्षा कोठेकर यांची उपस्थिती होती. 

पुढे बोलताना ते म्हणाले कि, आज पर्यावरण प्रदूषणाची समस्या गंभीर होत चालली आहे. अशा परिस्थितीत काळजीपूर्वक पर्यावरण वाचवण्याचा प्रत्येकानी प्रयत्न केला पाहिजे. गांधीवाद आपल्याला निसर्गाप्रती करुणेची भावना शिकवतो. 

जर आपल्याला येणाऱ्या पिढीसाठी पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल तर गांधींजीनी दिलेल्या मार्गाशिवाय दुसरा मार्ग असू शकत नाही. जर आपण महात्मा गांधींच्या पर्यावरणीय वैज्ञानिक विचाराचा आपल्या मार्गाने अवलंब केला तर आपण केवळ विनाशापासून स्वतःला वाचवू शकणार तसेच जगासमोर एक आदर्श ठेऊ ठेऊ शकू असे मत खासदार बाळू धानोरकर यांनी मानले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !