कोंडेखल येथील वाघाच्या हल्ल्यात बैल जखमी.



कोंडेखल येथील वाघाच्या हल्ल्यात बैल जखमी.


          सुरेश कन्नमवार                                         मुख्य संपादक ! एस.के.24 तास !


सावली : उपवनक्षेत्राअंतर्गत कोंडेखल या परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने बैलावर हल्ला करून जखमी केले. ही घटना आज रविवारी दुपारी 1.00. वाजता च्या सुमारास घडली. कोंडेखल येथील शेतकरी,मारोती सातारे हे नेहमी प्रमाणे आपल्या बैलांना चराई करिता जंगलात घेऊन गेले होते. तेव्हा त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने बैलावर हल्ला करून जखमी केले.त्या वेळेस सातारे यांच्यासह अनेक शेतकरी हजर होते. त्यांनी आरडाओरडा केल्याने वाघाने तिथून धूम ठोकली. दरम्यान या घटनेची माहिती व्याहाड खुर्द उपवन क्षेत्राचे  अधिकारी यांना देण्यात आली. आज रविवार असल्याने येऊ शकत नाही सोमवार ला पंचनामा करण्यासाठी येणार आहेत असे कर्मचारी सांगितले. गेल्या काही दिवसापासून या भागात बिबट,वाघ,यांचा वावर आहे.त्यामुळे वन्य प्राण्यांचे बंदोबस्त करण्याची मागणी कोंडेखल येथील नागरिक करीत आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !