न.प.मुल ची मोकाट डुकरांची जेरबंद योजना.

न.प.मुल ची मोकाट डुकरांची जेरबंद योजना.



नितेश मँकलवार ! एस.के.24 तास


मुल : नगरप्रशासनाने वराह पालन करणाऱ्यांना वारंवार सुचना देऊनही त्यांनी आपल्या पाळीव डुकरांना मोकाट सोडणे बंद न केल्याने शहरात या मोकाट डुकरांची वाढलेली संख्या व वाढलेला हैदोस बघता तक्रारी मोठ्या प्रमाणात येत असल्याने शेवटी नगरप्रशासनाने या मोकाट डुकरांची जेरबंद योजना आखली व सोमवारी सकाळी सकाळी गुजरी चौकात पहिला वराह (डुक्कर) जेरबंद करण्यात यश मिळविले.


सोमनाथ मार्गावर एका रिकाम्या प्राप्त अजून दोन डुकरांना जेरबंद करण्यात आले व पुढील कार्यवाही साठी या मोहिमेत सहभागी चमू सोमनाथ मार्गावर पुढे सरसावली आहे.

नगरप्रशासनाने आज राबविलेली ही मोहीम निश्चितच नगरवासियांना एक समाधान व्यक्त करण्यासाठी प्रवृत्त करीत आहे अशी प्रतिक्रिया या परिसरातील जनतेने प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली आहे.

जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्यावर अंमल करण्यात नपने एक पाऊल पुढे टाकले तर जनता निश्चितच सहकार्य करण्यासाठी पुढे आल्याशिवाय राहणार नाही व स्वच्छता अभियानात आपल्या नगराची देशात निर्माण झालेली छबी अधिक चांगली करण्यात मागेपुढे पाहणार नाही अशीही बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

नगर प्रशासनाने उचललेल्या या मोहिमेला शुभेच्छा दिल्या असून यासाठी मुख्याधिकारी व पूर्ण चमुचे अभिनंदन केले आहे.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !