कर्तव्यदक्ष पं.स.सभापती,विजय कोरेवार यांची तालुक्यात चर्चा. ★ कोरोनाच्या काळात जनतेच्या अडचणीकडे लक्ष...

कर्तव्यदक्ष पं.स.सभापती,विजय कोरेवार यांची तालुक्यात चर्चा.          

★ कोरोनाच्या काळात जनतेच्या अडचणीकडे लक्ष...


सुरेश कन्नमवार ! मुख्य संपादक ! एस.के.24 तास


सावली : देशात कोरोनाचा संसर्ग सुरू आहे.      या संकटकाळात आपापल्या परीने पदाधिकारी, अधिकारी काम करीत खरे उतरत आहेत.असेच कार्य सावली पंचायत समितीचे सभापती,विजय कोरेवार करीत असल्याने तालुक्यात त्यांची चर्चा आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊनमुळे सावली तालुक्यातील हजारो मजूर अडकल्याची कल्पना आल्याने ग्रामसेवकां  कडून मजुरांची माहिती घेतली.

ही बाब चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे लक्षात आणून दिली व जिल्हाधिकारी यांचे कडे मजुरांची यादी पोहचवली.

अनेक मजुरा सोबत फोनवर संपर्क करून धीर देत होते व अडचणीच्या वेळी संपर्क करण्यासाठी आपला मोबाईल नंबर मजूरांना दिले. तालुक्यातही कोरोना बाबत माहिती व गरजूंपर्यंत धान्य किट सुरळीत पोहचावे यासाठी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्यासोबत समन्वय साधत होते.संचारबंदी असतानाही गावोगावी अवैद्य दारूविक्री होत असल्याने दारूबंदी करावी यासाठी पोलीस विभागाला पत्र दिले. 

खेडी परिसरात दारूविक्री करणाऱ्या आरोपीला मुद्देमालासह पकडूनही दिले. उज्वला गॅस योजना मोफत असताना मूल येथील पुरवठादार गॅस धारकाना दुकानात फार्म भरण्यासाठी सांगत होता ही बाब माहीत होताच तहसीलदार यांचेकडे तक्रार करून गावात काम सुरळीत सुरू झाले मोफत गॅस योजनेचा फायदा गॅसधारकांना झाला. 

शासकीय धान्य कार्डधारकांना सुरळीत मिळावे यासाठी लक्ष देत असतांना सादागड येथील धान्य दुकानदार गैव्यवहार केल्याने चौकशी करून दुकानाला सील ठोकायला लावले. 

पायी जाणाऱ्या काही मजुरांसाठी जेवणाची व्यवस्थाही केली. रुग्णांना रक्ताची अडचण येऊ नये यासाठी अधिकारी कर्मचारी याना रक्तदाना साठी तयार करून पंचायत समिती येथे रक्तदान शिबीर घेतले.

तेलंगणा येथे कविता रामटेके मजुरीसाठी जाऊन अडकली असता इकडे पतीचा मृत्यू झाला. पोरका झालेल्या मुलाला आई मिळावी यासाठी प्रयत्न करून तिला गावात पोहचन्यापर्यंत  प्रशासनाकडे पाठपुरावा केला. 

जुनासुर्ला येथिल ताराबाई पाटेवार ही तेलंगणा राज्यात मिरची तोडण्याचे कामासाठी गेली मात्र तिची प्रकृती ठीक नसल्याने घाबरली होती. तिचे सर्व रिपोर्ट घेऊन पालकमंत्री विजय वडेट्टीवार, जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमणार,पोलीस अधीक्षक,डॉ महेश्वर रेड्डी,मुख्यकार्यपालन अधिकारी,राहुल कार्डिले यांचेकडे वारंवार पाठपुरावा करून त्या महिलेला गावात परत आणले. तेलंगणाच्या मजुरांची होणारी होरपळ लक्षात घेता त्यांना परत आणण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे ईमेलद्वारे केली. शासनाने मजूरांना आपल्या गावी जाण्याची परवानगी देताच वाटेल त्या वाहनाने तेलंगणा येथील मजूर सीमेवरील पोडसा व लाक्कडकोट येथे पोहचले परंतु महाराष्ट्रात येण्यासाठी अडचण येत होती ही बाब पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे लक्षात आणून दिली. मंत्री महोदयांनी गाड्याची व्यवस्था केली पण मजुरांसोबत संपर्क ठेऊन कोण कोठे आहे कसे यायचे याबद्दलची माहिती देण्याचे काम मात्र सभापती,विजय कोरेवार यांनी केले.

मजूर पोहचल्या नंतरही प्रत्यक्षात जाऊन काय व्यवस्था आहे,कोरेन्टाईन झाले की नाही, वैद्यकीय तपासणी झाली की नाही याकडेही लक्ष असते. ग्रामसेवकांच्या सुचना,अडचणी सोडविण्याचे कामही करीत असतात.एकंदरीत कामा वरून सभापती,विजय कोरेवार हे कर्तव्यदक्ष असल्याची चर्चा तालुक्यात आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !