शेतकरी मित्रांचे पद कायमस्वरूपी ठेवणे बाबत मा.तहसीलदार साहेब,सावली यांना शेतकरी मित्रांचे निवेदन.

शेतकरी मित्रांचे पद कायमस्वरूपी ठेवणे बाबत मा.तहसीलदार साहेब, सावली यांना शेतकरी मित्रांचे निवेदन.



सुरेश कन्नमवार ! मुख्य संपादक

एस.के.24 तास

सावली : महाराष्ट्र शासनाचे कृषी विभाग अंतर्गत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) योजने अंतर्गत कृषी विभागाच्या योजना व शेतकऱ्यांच्या बांधावरील समस्या सोडवण्यासाठी शेतकरी मित्राची निवड आत्मा योजने अंतर्गत व ग्राम सभेच्या  माध्यमातून करण्यात आली.

त्यामुळे कृषी विभागाच्या विविध योजनेचा फायदा थेट शेतकऱ्यांना शेतकरी मित्राच्या माध्यमातून मिळत होते. तरी शेतकऱ्यांच्या विविध समस्या कृषी अधिकारी यांना सांगून शेतकरी वर्गाला मोठा हातभार लावण्याचे काम शेतकरी मित्र करीत होते.

एकंदरीत कृषी विभाग व शेतकरी यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून शेतकरी मित्र अल्पशा अनुदानावर काम करीत असताना अचानक कृषी आयुक्त पुणे यांनी सण - २०२० / २०२१ व २०२१ /२०२२ अंतर्गत शेतकरी मित्रावरील खर्च मर्यादित ठेवणे बाबत अशा स्वरूपाचे पत्र दिनांक,२५/०५/२०२१ ला काढुन संबंधित जिल्हा आत्मा कार्यालयात पाठविले.

व दोन गाव एक शेतकरी मित्र ही संकल्पना बंद करून एक कृषी सहायक एक शेतकरी मित्र ही नवीन संकल्पना अंमलात आणण्याच्या सुचना संबंधित विभागाला दिल्यामुळे जिल्ह्यातील ७३८ शेतकरी मित्रावर निवडीचा गवा आला आहे.

गेले १५ वर्षापासून अनेक शेतकरी मित्र अल्पशा अनुदानावर कृषी विभागाला सहकार्य व मदत करीत आहे. मात्र कृषी आयुक्त तेच्या या निर्णयामुळे शेतकरी मित्र बंद करण्याच्या सूचना कृषी विभागाला मिळालेले आहेत.

माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की.मागील १५ वर्षांपासून १०००/- प्रति महिना मानधनावर नियुक्त शेतकरी मित्र अल्प मानधाना तील तमा न बाळगता शेतकऱ्यांना सेवा देत आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी मित्रांना पदावरून कमी करण्याचा आदेश रद्द करावा. व शेतकरी मित्रांना कायमस्वरूपी ठेवण्याचे आदेश देण्याची विनंती जिल्हा शेतकरी मित्र संघटना सावली (चंद्रपूर) यांच्या वतीने मा.तहसीलदार साहेब, सावली यांना निवेदन देण्यात आले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !