बाप रे... नाग सापाने चक्क सस्याचे सोळा पिल्ले गिळले.

बाप रे... नाग सापाने चक्क सस्याचे सोळा पिल्ले गिळले.


नितेश मँकलवार ! कार्यकारी संपादक ! एस.के.24 तास


मुल : नाग सापाने पाळीव सशाचे 16 पिल्ले फस्त केल्याची घटना आज दिनांक सप्टेंबरला रात्रो आठ वाजता चे दरम्यान घडली. ही घटना मूल तालुक्यातील करवण या गावातील आहे.

करवण येथील रहिवासी दिवाकर चौधरी यांचे घरी साडेपाच फुट लांबीचा नाग साप निघाला.चौधरी यांच्या घरी पाळलेले सशाचे सोळा पिल्ले होते.नागाची लक्ष सशाच्या पिल्लांकडे गेली. लक्ष जाताच नाग सापाने सस्याला मारुण त्याचे सोळा पील्ले फस्त केले.



या घटनेची माहीती मिळताच मुल येथील संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य,तथा सर्पमित्र तन्मयसिंह झिरे, दिनेश खेवले,अक्षय दुम्मावार यांनी घटना स्थळी जाऊन सुरक्षीतपणे नाग सापाला पकडले.नागाला पकडताच त्याने गीळलेले सस्याचे सोळा पील्ले बाहेर काढले.


कोणत्याही भक्ष्य गीळलेल्या सापाला पकडल्या नंतर तो साप खाल्लेले भक्ष्य बाहेर काढतो,हें विशेष. ही सांपाची नैसर्गीक प्रतीक्रीया असल्याची माहिती सर्पमित्र,उमेशसिह झिरे यांनी आमचे एस.के.24 तास चे कार्यकारी संपादक, नितेश मँकलवार यांच्या शी बोलताना दिली.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !