सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव परिसरात विज कोसळल्याने 26 शेळ्या मृत्युमुखी.
सुरेश कन्नमवार ! मुख्य संपादक एस.के.24 तास
सिंदेवाही : तालुक्यातील नवरगाव येथील कुरमार ( धनगर ) बांधव आपल्या शेळ्या शेत शिवारात चारत असताना मेघ गर्जनेसह वीज कोसळल्याने 26 शेळ्या जागीच मृत्यू पावल्याने गरिबीचे जीवन जगणाऱ्या कुरमार बांधवाच्या अतोनात नुकसान झाल्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केले जात आहे. त्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी कुरमार / धनगर समाज तर्फे करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्त असे की नवरगाव येथील मेंढपाळ व्यवसाय करणारा समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे. जंगल परिसरात जाण्यासाठी वन विभागाचे आडकाठी येत असल्याने मेंढपाळ बांधव उदरनिर्वाहाच्या विवंचनेत सापडलेला आहे.अशातच ज्यांच्या कडे 5,6 शेळ्या होत्या त्यांच्या एकही शेळ्या शिल्लक राहिले नाही.
आज नवरगाव जवळील आलेसुर गाव परिसरात 130 शेळ्याचा कळप चारत असतांना दुपारी 1.30 ते 2.वा.दरम्यान वीज कोसळल्याने त्यातील 26 शेळ्या मृत्युमुखी पडले.
त्यात बिराजी जिगरवार,6 बुधाजी रेगडवार,5 बुधाजी कंकलवार,3 मल्ला बाकिरवार,5 ज्ञानेश्वर मार्लावार,3 मनोहर कड्रीवार,4 या मेंढपाळ बांधवांच्या शेळ्या मृत्युमुखी पडले. शासनाकडून त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी कुरमार / धनगर समाज तर्फे करण्यात येत आहे.