बेघर वस्तीत राहणाऱ्या नागरिकांच्या प्लॉटची निशुल्क मोजणी करुन सर्वांना पट्टे देण्यात येईल. ◆ खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे झोपडपट्टी धारकांना आश्वासन.

बेघर वस्तीत राहणाऱ्या नागरिकांच्या प्लॉटची निशुल्क मोजणी करुन सर्वांना पट्टे देण्यात येईल.

◆ खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे झोपडपट्टी धारकांना आश्वासन.    



एस.के.24 तास                             

मुल : मागील भाजपच्या सत्ता काळात मुल येथील झोपडपट्टी धारकांना घराचे पट्टे देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु पाच वर्षांचा कालावधी होऊनही पूर्ण करण्यात आलेले नाही. याबाबत मुल येथील कांग्रेसचे नेते व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी जि.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचेकडे जाऊन मुलच्या सर्व झोपडपट्टीत राहणारी गरीब नागरिकांना अजूनही पट्टे मिळालेले नाही. अशी मागणी केली. राहायला घर नाही, आहे तर स्वतः च्या मालकीची  नाही या गंभीर प्रश्नांची वेळीच दखल घेऊन संतोषसिंह रावत यांनी   चंद्रपूर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचेकडे स्वस्त भेट घेऊन झोपडपट्टी धारकांची समशा लक्षात आणून देताच लोकप्रिय खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी दिनांक २४ सप्टेंबर २०२१ रोजी केवळ मुलचा दौरा निश्चित करून  संतोषसिंह रावत, तालुका कांग्रेसचे अध्यक्ष ,तथा सभापती घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावर, नागसेविका लिनाताई फुलझेले  यांच्यासह तालुका व शहर कांग्रेसचे सर्व पदाधिकारी संपूर्ण दिवस मुलच्या अनेक वार्डात भेट देऊन झोपडपट्टी धारकांची समशा जाणून घेऊन सर्व झोपडपट्टी धारकांकडून लेखी निवेदन स्वीकारले आणि लवकरच सर्वांना घराचे पट्टे देण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश कांग्रेसचे सचिव विनोद दत्तात्रय, बांसालसिंग, सोहिल शेख,  माजी सभापती वैशाली पुलावर, माजी जि.प.सदश मंगला आत्राम, महिला कांग्रेसच्या अध्यक्ष रुपाली संतोषवार, उपसभापती संदीप  कारमवार,संचालक अखिल गांगरेड्डीवारसंचालक राजेंद्र कन्नमवार, शांताराम कामडे, डाकट्टर  पद्माकर लेनगुरे,अन्वर शेख,  किशोर घडसे, शेतकरी कांग्रेसचे अध्यक्ष गुरुदास चौधरी,  विवेक मुत्यालवार, राजू वाढई, कृष्णा सुरमवार, चंद्रकांत चतारे  उपस्थित होते. याप्रसंगी कांग्रेसचे शहर अध्यक्ष सुनील शेरकी, कार्याध्यक्ष कैलास चलाख, नगर सेविका ललिता फुलझेले,सुरेश फुलझेले , शहर उपाध्यक्ष संदीप मोहबे, यांच्या गृह भेटी घेऊन वार्डातील समाश्याचे निवेदन स्वीकारले, तसेच निष्ठावाण कांग्रेस पदाधिकारी शेखर चितलोजवर यांचे आकस्मिक निधन झाल्याने त्यांच्याशी घरी सांत्वनपर भेट करून कुटुंबाची विचारपूस केली.  कांग्रेसचे नगरसेवक हे गंभीर आजार झाल्याने त्यांच्याही घरी भेट देऊन विचारपूस केली.                               विश्रांम गृह येथे संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या शेतीची रानटी डुकरांनि सर्व रब्बी हंगामाची नासाडी करीत आहेत याबाबतचे निवेदन किशोर घडसे व अन्य शेतकरी  यांनी दिले.यावर खासदार बाळू धानोरकर यांनी वरिष्ठ वनाधिकारी यांचेशी संपर्क साधून शासनाच्या वतीने सोलर करंट कुंपण मिळवून देण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करीन असे सांगितले. तसेच ख्रिस्ती समाज स्मशानभूमी साठी मागणी केली असता नगर परिषदेचे CEO यांना बोलावून तात्काळ तसा ठराव माझ्याकडे सादर करावा अशी सूचना केली. तसेच अंतरगाव पारडवही(मुल) या सेवेकडे जाणारा पांदण  रस्ता व्हावा अशी विनंती गुरुदास गुरनुले यांनी केली तेव्हा खनिज विकास निधी किंवा खासदार निधी मधून मंजूर करण्यात येईल यासाठी पांदण रस्त्याचा प्रस्ताव त्वरित सादर करावा असे बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांना सूचना केल्यात. वन विभाग कर्मचारी,प्राथमिक शिक्षक यांच्याही समाश्याचे निवेदन स्वीकारले. याप्रसंगी तालुक्यातील व नगरातील असंख्य कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !