केंद्र सरकारच्या शेतकरी धोरणा विरुद्ध व वाढत्या महागाईच्या निषेधार्थ संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वात बंद.
★ पेट्रोलपंप,राईसमिल, कापड,किराणा,हाटेल,दारु दुकान सह किरकोळ दुकान ही बंद.
नितेश मँकलवार ! कार्यकारी संपादक ! एस.के.24 तास
मुल : शेतकरी विरोधी केंद्र सरकारने तीन काळे कायदे पारीत करून शेतकऱ्यांची शेती स्वतःची समजून देशाच्या शेतकऱ्यांना देशोधडीला लावले,पेट्रोल,डिझेल,गॅस,किराणा अशा जीवनावश्यक वस्तुंची भाववाढ करुन गरीब जनतेला,रस्त्यावर आणले,खाजगीकरण करून सुशिक्षित युवकांना बेरोजगार केले.
या केंद्र सरकारच्या निषेधार्ह मोदी शासनाच्या विरोधात २७ सप्टेंबर २०२१ रोजी संपूर्ण भारत बंद पुकारण्यात आला असून या भारत बंद ला मुल तालुका कांग्रेस कमिटीच्या वतीने कांग्रेसचे नेते,मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष,संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वात सकाळ पासूनच कळकळीत बंद पाडण्यात आला. शासकीय,कार्यालये वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद होती.या बंदला व्यापारी सुद्धा स्वखुशीने आपली प्रतिष्ठाने, किरकोळ दुकाने,राईसमिल,सह सर्व बंद ठेऊन सहकार्य केले आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनी.संतोषसिंह रावत अध्यक्ष,चं.जि.मध्य.सह.बॅक यांच्या नेतृत्वाखाली बंदला संबोधित करतांना संतोषसिंह रावत यांनी महागाई बाबत व शेतकरी विरोधी धोरणाबाबत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादी युवक कांग्रेस,जितेंद्र आव्हाड युवा मंच,ओबीसी संघटना, आटोचालक संघटना,ग्रामीण शेतकरी संघटना,अनेक सामाजिक संघटना यांनी जाहीर पाठिंबा देत केंद्र व मोदी सरकारचा नारेबाजी करीत निषेध केला.
मुल बंद पुकारण्यात पुढाकार घेण्यात तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा बाजार समिती सभापती,घनश्याम येनुरकर,संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष,राकेश रत्नावार, उपसभापती,संदीप करमवार, संचालक व भेजगाव सरपंच अखिल गांगरेड्डीवार,संचालक,राजेंद्र कन्नमवार, राजू पाटील मारकवार,किशोर घडसे, ओबीसी किसन सेलचे अध्यक्ष, गुरुदास चौधरी,हसन वाढई,माजी नगर सेवक,गुरु गुरनुले,जितेंद्र आव्हाड युवा मंच जिल्हा अध्यक्ष मंगेश पोटवार, राष्ट्रवादी युवक कांग्रेस अध्यक्ष,समीर अल्लूरवार,गौरव शामकुळे,सुरेश फुलझेले,विवेक मुत्यालवार,रुमदेव गोहणे,शहर कांग्रेस,उपाध्यक्ष संदीप मोहबे,रणजित आकुलवार,गणेश रणदिवे,कैलास चलाख,गंगाधर घुगरे,सुनील मंगर,चंदू चतारे, बबलू सय्यद, युवक कांग्रेस अध्यक्ष व्यंकटेश पुल्लकवार,गणेश कोडापे, कपिल गुरनुले,राजू चिलके,जनार्धन भुरसे,प्रभू धोटे, निकुरे,प्रवीण खानोरकर,पंकज शेंडे,आकाश शेंडे,जगदीश टिंगुसले, योगेश सुखदेव,सुरेश मारकवार,बलवंत मारकवार,सुरेश उंदिरवाडे, अमोल ठाकूर,रितेश सुमंतवार, कपिल गुरनुले, यांचेसह आटोरिक्षा संघटनेचे सर्व सदश, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी,शेकडो कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.