चंद्रपूर / गडचिरोली मेंढपाळ बांधवांच्या समस्या घेऊन खासदार बाळु भाऊ धानोरकर यांना निवेदन.
नितेश मँकलवार ! कार्यकारी संपादक ! एस.के.24 तास
मुल : चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात मेंढपाळ बांधवांवर खुप मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे.मेंढपाळ बांधव आपल्या शेळ्या मेंढ्या घेऊन जंगलोजंगली, मोकळ्या जागेत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.मात्र मेंढपाळ बांधवांवर वनविभागाचे अधिकारी मेंढपाळ बांधवांकडून आर्थिक व्यवहार करून त्यांना हाकलून लावतात व शेळ्या मेंढ्या चराईसाठी बंधन करतात.त्यामुळे मेंढपाळ बांधवांना चराई पासेस देण्यात यावे जेणेकरून शेळ्या मेंढ्या चराई करता येईल, नुकताच भंगाराम तळोधी येथील ७ वर्षीय मेंढपाळ बालक मनोज तिरुपती देवेवार यांचे मेंढ्या चारत वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडला.त्या कुटुंबावर खूप मोठे संकट ओढवले आहे.त्याना त्वरीत नुकसान भरपाई देण्यात यावी.व त्या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यात यावे.मुल तालुक्यात शेळ्या मेंढ्यावर रोगाने थैमान घातले आहे.मात्र मुल तालुक्यात पशुवैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे शेळ्या मेंढ्या असेच मृत्यू पावत आहेत.त्यामुळे मेंढपाळावर उदरनिर्वाहाचा प्रश्न उद्भवत आहे.त्यामुळे मुल तालुक्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदभरती करण्यात यावी.शेळ्या मेंढ्या वर आलेल्या रोगांवर कुठलेही औषधी,लसीकरण मोफत मिळत नसल्यामुळे मेंढपाळ बांधवांवर आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांत औषधी व लसीकरण मोफत देण्यात यावी.
संजय कन्नावार,अशोक कोरेवार,नितेश मॅकलवार,वासुदेव,गणेश रेगलवार,दत्तू येग्गावार,सुधाकर रेगडवार,अशोक डेंकरवार माणिक रेगलवार,आकाश यारेवार,राजू मेङिवार समाज बांधव उपस्थित होते.