मारोडा ग्रामपंचायत स्थापनेपासून तर आतापर्यंतची रेकार्ड फुल विशेष ग्रामसभा.

मारोडा ग्रामपंचायत स्थापनेपासून तर आतापर्यंतची रेकार्ड फुल विशेष ग्रामसभा.


नितेश मँकलवार!कार्यकारी संपादक!एस.के.24 तास


मुल : आज दिनांक 21/9/ 2021रोजी मंगळवार ला संपन्न झाली साधरण 400ते 500ग्रामस्थांच्या उपस्थितीत ही रंगतदार ग्रामसभा करण्यात आली. ग्रामसभेमध्ये  1) रोजगार हमी योजना,घर टॅक्स वसुली,महिला बाल कल्याण च्या विविध योजना,समाज कल्याण च्या विविध योजना, व  तसेच महत्वाची म्हणजे जुन्या ग्रामपंचायत कमेटीने कुठलाही प्रकारची ग्रामसभा न घेता  धर्मदाय आयुक्त याच्याकडे दिशाभूल करणारा ग्रामसभेचा 20 लोकांच्या  खोट्या स्वाक्षरीचा ठराव घेऊन धर्मादाय आयुक्तांना पाठवण्यात आला व गावातील लोकांना माहिती न देता स्वतःच्या स्वार्थासाठी  ट्रस्ट बनवण्याचा प्रयत्न करत आहे.

 अशा दिशाभूल करणारा कमेटी ची उकल ग्रामसभेत मध्ये करण्यात आली व स्वता:चा मनमानी श्री.सोमनाथ देवस्थानाची घटना बदलवून ट्रस्ट बनवीन्यात आली व तसेच गावातील लोकांची भावना दुःखवील्या त्या बद्दल गावातील लोकांना रोष होता तो रोष नवनिर्वाचित कमेटीने  ग्रामस्थांनाच्या सहमतीने व कोणताही जाती धर्माचा भेदभाव न करता सर्वधर्म समभाव याप्रमाणे  प्रतेक समाजातील लोकांना  सोमनाथ देवस्थान कमेटी मधे सदस्य बनविण्याचा सर्वानुमते ठरविण्यात आला. तसेच तंटामुक्ती गाव समिती गठित करण्यात आली व ग्रामसभा संपूर्ण गावकऱ्यांच्या सहकार्याने शांततेत पार पडली.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !