ब्रेकिंग न्यूज... बिबट्याच्या हल्ल्यात गोंडपिंपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येतील सात वर्षीय बालक ठार.

 ब्रेकिंग न्यूज...

बिबट्याच्या हल्ल्यात गोंडपिंपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येतील सात वर्षीय बालक ठार.

ब्रेकिंग न्यूज...

बिबट्याच्या हल्ल्यात गोंडपिंपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येतील सात वर्षीय बालक ठार.



नितेश मँकलवार ! कार्यकारी संपादक ! एस.के.24 तास


गोंडपिंपरी : तालुक्यातील भंगाराम तळोधी येतील मेंढपाळ बांधव गोंडपिंपरी तालुक्यालगत असलेल्या गडचिरोली जिल्ह्य़ातील आष्टी परिसरात कंसोबा मार्कंडा येते उदरनिर्वाहासाठी मेंढ्या चराई करण्याकरिता गेले होते. एफडीसीएम fdcm कक्ष 217 मध्ये सदर हल्ला झाला. देवावार कुटुंबातील त्यांच्या बालक देखील होता. 

जंगलात दबा धरून बसलेल्या बिबट्याने leopard attack अचानक सात वर्षीय मनोज तिरुपती देवावार रा.भंगाराम तळोधी या बालकावर हल्ला केला. 

त्यात त्या बालकाचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेमुळे भंगाराम तळोधित हळहळ व्यक्त केल्या जात आहे. यावेळी आष्टी इल्लूर जी.प.सदस्य रूपाली पंदीलवार,शिवसेना उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे,अशोक खंडाळे,गणेश शिंगाडे, संजय भोयर,यांनी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या बालकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करा अशी मागणी घटनास्थळी गाठून वनविभागाकडे केली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !