संजय गांधी निराधार योजनेची 135 प्रकरणे मंजूर मूल तालुक्यातील नागरिकांना दिलासा
नितेश मँकलवार - कार्यकारी संपादक एस.के.24 तास न्युज नेटवर्क
मुल : संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थी निवड सभा बैठक तहसिल कार्यालय मूल येथे राकेश रत्नावार अध्यक्ष,संजय गांधी निराधार योजना समिती यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.तसेच,माहे जुर्ले,आॅगस्ट महिण्यांचे शासना कडून अनुदान प्राप्त न झाल्यामुळे अनुदान वितरणास थोडा विलंब झालेला आहे.
अनुदान तात्काळ प्राप्तक्रण्याकरिता षासनास विनंती करण्याबाबत समिती वतीने विनंती प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे.
अनुदान तात्काळ प्राप्त करण्याकरीता षासनास विनंतीकरण्याबाबत समितीचे वतीने विनंती प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे.
कोवीड-19 च्या प्रार्दुभावामुळे मृत्यू पावलेल्या कुटूंबातीलपत्नीला अनुदान देण्यांचे दृष्टीने शासना ने बि.पि.एल.ची अट घातलेली आहे त्यामुळे अनेक कुटुंबातील व्यक्तीकडे बि.पि.एल.कार्ड नसल्यामुळे अनुदानापसून वंचीत आहेत.याबाबत समितीचे सभेतसविस्तरीचर्चा करण्यात येउन कोवीड-19च्या प्रार्दुभावामुळे अनेक कुटुंबावर आर्थीक संकट ओढावलेले असून त्यांना आर्थीक सहाय्य करण्यांच्या दृष्टीने बि.पि.एल.ची अट शीथील करण्याबाबत शासनास विनंती करण्यात यावे असे समितीचे सभेत ठरविण्यात आलेले आहे.
तसेच संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष,श्री राकेश या.रत्नावार यांनी जास्तीत जास्त लाभार्थ्यांना फायदा होण्यांचे दृष्टीने प्रयत्नशील आहेत.सदर योजने संबंधाने काही अडचणी असल्यास तहसिल कार्यालयाचे कर्मचारी यांचे शी संपर्क साधुन कागदपत्राची पुर्तता करण्यात यावी.
तरी सदर सभेला संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष ,मा.राकेश या.रत्नावार,मा.ठाकरे साहेब,
नायब तहसिलदार,तसेच संजय गांधी निराधार येाजनासमितीचे सदस्य श्री नितीन येरोजवार, श्री.गंगाधर कुनघाटकर,श्री दशरथ वाकुडकर,श्री संजय गेडाम,सौ.अर्चना चावरे, सौ.रूपाली संतोशवार व संजय गांधी निराधार योजनेचे संबंधित कर्मचारी श्री गिरडकर उपस्थित होते.