दोन वर्षांपासून सोंडो येथील बंद पथदिवे तत्काळ सुरू करण्याची युवा स्वाभिमान पक्षाची मागणी.

दोन वर्षांपासून सोंडो  येथील बंद पथदिवे तत्काळ सुरू करण्याची युवा स्वाभिमान पक्षाची मागणी.



एस.के.24 तास


राजुरा : सविस्तर वृत्त असे की राजुरा तालुक्यातील राजुरा शहरापासून १४ की मी अंतरावरील सोंडो येथील गावकऱ्यांनी युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हा अध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांना भ्रमणध्वनीद्वारे गावातील अत्यावश्यक विविध समस्यां सांगताच जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांनी दिनांक-२५/०८/२०२१ रोजी प्रत्यक्ष त्या गावी जाऊन त्या गावातील समस्या फेसबुक द्वारे थेट लाईव्ह येऊन प्रशासनासमोर आणण्याचा प्रयत्न केला. सोंडो या गावी  एक ते दीड वर्षापासून पथ दिवे बंद पडलेले आहेत ज्यामुळे गावामध्ये रात्री अंधारात काहीही दिसत नाही. व या गावातील रस्त्यांमध्ये मोठमोठे खड्डे असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहेत. तथा गावकऱ्यांना नियमितपणे मुबलक पिण्याचे पाणी मिळत नाही. पाणी सोडण्यासाठी ठराविक वेळ ठरविला नसल्याने  कुठल्याही वेळेवर पाणी सोडत असल्यामुळे लोकांना फक्त वाट पाहावी लागत असते व जाणीवपूर्वक गावकरी शेतावर गेल्यानंतर पाणी सोडण्यात येते तर ठराविक वेळ ठरवून नियमितपणे वेळेवर पाणी गावकऱ्यांना देण्याकरिता श्री. सुरज ठाकरे यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून वेळेवर पाणी देण्यास सांगितले. व गेल्या दोन वर्षापासून नाल्यांची साफसफाई होत नसल्यामुळे मच्छर चे प्रमाण वाढल्याने गावकरी डेंग्यू सारख्या आजारास बळी पडत आहेत. व ह्या नाल्या साफ होत नसल्याने बुजून गेल्या आहेत ज्यामुळे सांडपाणी रस्त्यावर जमा होते. जे दुर्गंधी व रोगराई चे कारण या गावी खूप जास्त प्रमाणात ठरत आहे. तरीदेखील मच्छर मारण्याकरिता अद्याप या गावी फवारणी करण्यात आली नाही. व गावामध्ये समशान भूमी ची व्यवस्था नसल्याने प्रेत नेमके कुठे जाळायचे असा गंभीर प्रश्न गावकऱ्यांन समोर उपस्थित झालेला आहे. गावकऱ्यांनी समशान ची व्यवस्था करून देण्याकरिता तथा समशानकळे जाण्याकरिता रस्ता करून देणे बाबत ग्रामपंचायतीमध्ये वारंवार अर्ज करून देखील ग्रामपंचायतीने जाणीवपूर्वक या सर्व बाबींकडे दुर्लक्ष केले. शेवटी गावकऱ्यांनी कंटाळून स्वतःचा शेतामधून आम्ही रस्त्याकरिता जागा देतो असे कबूल करून देखील सुद्धा सोंडो या गावातील ग्रामपंचायतसह राजुरा तालुक्यातील नगरपरिषद,  नगरपंचायत, व आमदार श्री. सुभाष धोटे हे सर्व जणू काही माणसाच्या प्रति माणुसकी उरली नाही अशाप्रकारे यांच्या अधिकार क्षेत्रातील कामांकडे व गावातील विकासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे एकंदर चित्र सध्या स्थिती मध्ये दिसत आहे. तथा केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या सरकारी योजनांपासून देखील हे गाव वंचित आहे,  घरकुल, हागणदारीमुक्त शौचालय, सदर गाव हे पेसा विभागा अंतर्गत येते असून देखील या गावात हागणदारीमुक्त करण्याकरिता ग्रामपंचायतच्या सचिवाकडून अद्याप कुठलेही पाऊल उचलले गेले नाही.  दुर्दैवाची बाब म्हणजे ही की राजुरा शहरापासून नगरपरिषद, पंचायत समिती, व या विधानसभा क्षेत्रातील आमदारांच्या निवासस्थानापासून नुकतेच १४ की मी अंतरावरील हे गाव व येथिल  गावकरी अत्यावश्यक सेवांपासून वंचित असून देखील या गावी अशी दुरवस्था आहे व ही खूप मोठी शोकांतिका असल्याची श्री. सुरज ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली. व या सर्व समस्या तत्काळ मार्गी लावण्याकरिता आज दिनांक:- २६/०८/२०२१ ला जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर व तसेच २७/०८/२०२१ ला सह उपविभागीय अधिकारी साहेब राजुरा, उप अभियंता साहेब महाराष्ट्र राज्य विद्युत पुरवठा विभाग, गट विकास अधिकारी साहेब पं.स.राजुरा आणि तहसीलदार साहे राजुरा यांना निवेदन देऊन तात्काळ सर्व समस्या मार्गी लावण्यास सांगितले.

सूरज भाऊ ठाकरे व राजुरा तालुक्यातील युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी राजुरा तालुक्यातील प्रत्येक गावा गावात जाऊन लोकांशी भेटून गावातील समस्या जाणून घेत आहे व त्या त्या विभागातील अधिकाऱ्यांना भेटून समस्यांचा आढावा घेतल्या जात आहे.

युवा स्वाभिमान पार्टी चे जिल्हाध्यक्ष सूरज भाऊ ठाकरे यांचा नेतृत्वात २६/०८/२०२१ ला जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर व तसेच २७/०८/२०२१ ला सह उपविभागीय अधिकारी साहेब राजुरा, उप अभियंता साहेब महाराष्ट्र राज्य विद्युत पुरवठा विभाग, गट विकास अधिकारी साहेब पं.स.राजुरा आणि तहसीलदार साहे राजुरा यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी राहुल चौहान, आल्वीन सावरकर,आशिष यमनुरवार,अमोल ताठे, मंगेश वडस्कर,निखिल बाजाइत व भूपेश साठोने उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !