हळदी दहेगाव-मानकापूर रस्त्यावरील खोदून ठेवलेले सायडिंग त्वरित बुजवावे नागरिकांची मागणी.

हळदी दहेगाव-मानकापूर रस्त्यावरील खोदून ठेवलेले सायडिंग त्वरित बुजवावे नागरिकांची मागणी. 


          नितेश मँकलवार                                    कार्यकारी संपादक - एस.के.24 तास


मुल : तालुक्यातील हळदी दहेगाव-मानकापूर रस्त्याच्या दोन्ही सायडिंगचे खोदकाम मागील दोन वर्षांपूर्वी पासून खोदून ठेवल्यामुळे तीनही गावातील नागरिकांना व जनावरांना जाण्या-येण्यासाठी धोका निर्माण झाला असून हळदी येथील एका शेतकऱ्यांची बैलबंडी देखील फसली त्यामुळे नागरिकांना आपला जीव धोक्यात टाकून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब कांग्रेसचे नेते तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांना हळदी ग्रामस्थांनी प्रत्यक्ष भेट घेऊन  समस्या लक्ष्यात आणून देऊन खोदलेले काम बुजविण्यात यावे अशी मागणी केली.   यावर संतोषसिंह रावत यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता यांचेकडे लेखी निवेदन द्यावे असा सल्ला गावकऱ्यांना दिला.                  

मुल तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती घनश्याम येनुरकर यांच्या नेतृत्वात उपसभापत संदीप कारमवार, भेजगावचे सरपंच तथा बाजार समिती संचालक अखिल गांगरेड्डीवार, संचालक व विविध कार्यकारी सोसायटीचे सध्या राजेंद्र कन्नमवार, आदर्श सहकारी खरेदी विक्री सोसायटीचे सभापती पुरुषोत्तम भुरसे, ग्राम पंचायत सदस्य शरद भुरसे,शरद आत्राम, ग्रामस्थ सुधीर लेनगुरे, रवींद्र चलाख,जितेंद्र कोठारे, दीपक लेनगुरे, अनिल मडावी,महेश चीचघरे,तगदिर कोठारे यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता मुल यांना लेखी निवेदन देऊन खोदकाम बुजवून देण्यात यावे अशी मागणी केली असता उपकार्यकारी अभियंता श्री.वसूले साहेब यांनी आपली मागणी रास्त आहे आणि त्वरित खोदलेल्या सायडिंग बुजविण्यात येतील असे निवेदन कर्त्यांना आश्वासन दिले.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !