नामदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या प्रयत्नाने वैशिष्ट्य पुर्ण निधि अंतर्गत नगरपंचायत सावली येथे ३ कोटी विकास कामांसाठी मंजूर.
एस.के.24 तास
सावली : क्षेत्राचे आमदार व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री,नामदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडे सावली नगरपंचायत अंतर्गत येत असलेल्या येथील MECEB कॉलनी,विद्यानगर कॉलनी,विनायक नगर कॉलनी येथील अनेक वर्षांपासून या कॉलनीना कोणत्याही निधी मधुन कोणतेही विकास कामे आज पर्यंत झाली नाहीत या कॉलनीमध्ये रस्ते चिखलमय झाले आहे. त्यामुळे सावली तील प्रत्येक गल्ली गल्लीतील रस्ते नाल्या व्हावे आणि सावलीतील प्रत्येक गल्लीला चिखल मुक्त व्हावे प्रत्येक रस्ते सिमेंट काँक्रीटचे बनावे या उद्देशाने सावली तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष,नितीन दुवावार यांनी या कॉलनीची समस्या वारंवार विजयभाऊ वडडेट्टीवार यांचे कडे सातत्याने निवेदन देऊन पाठपुरावा केला याची दखल घेत नामदार विजयभाऊ वडडेट्टीवार यांनी वैशिष्ट्य पुर्ण निधि अंतर्गत नगरपंचायत सावली येथे ३ कोटी सिमेंट रोड व नाली बांधकाम विकास कामांसाठी मंजूर करून दिले.
नगरपंचायत सावली येथील जनतेने व कार्यकर्ते यांनी विजयभाऊचे आभार व्यक्त केले.