पुन्हा एकदा भारतीय क्रांतिकारी संघटनेने चिमुर क्रांतीभूमीचा इतिहास जिवंत केला ; १६ आगस्ट क्रांती दिनी चिमुर - आष्टी क्रांती एक्सप्रेस एस टि बस फेरी होणार सुरु

पुन्हा एकदा भारतीय क्रांतिकारी संघटनेने चिमुर क्रांतीभूमीचा इतिहास जिवंत केला ; १६ आगस्ट क्रांती दिनी चिमुर - आष्टी क्रांती एक्सप्रेस एस टि बस फेरी होणार सुरु




एस.के.24 तास


चिमुर : आष्टी गावांनी १६ आगस्ट १९४२ रोजी  भारत देशाला स्वतंत्र मिळविण्यासाठी स्वातंत्र्यासाठी लढा दिला. या क्रांतीभूमीच्या नावाने चिमुर आष्टी क्रांती एक्सप्रेस एस टि बस फेरी सुरु करण्यात आली होती. कालांतराने बस फेरी बंद करण्यात आली होती. 

 
गेल्या ४० वर्षाआधीचा  स्वातंत्र्याचा, राष्ट्रसंताचा, क्रांतिभूमीचा इतिहास भावी पिढी समोर जिवंत राहावे यासाठी भारतीय क्रांतिकारी संघटनेच्या सतत मागणीने चिमुर - आष्टी क्रांती एक्सप्रेस एस टि बस फेरी सुरु करण्यास यश आले. त्यामुळे चिमुर आष्टी क्रांतीभूमी आणि राष्ट्रसंतांचा, शहिदांचा क्रांतिकारी इतिहास पुन्हा एकदा जिंवत केला. शहिदांचा सन्मान मिळवून दिला. 
       

भारतीय क्रांतिकारी संघटनेद्वारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डार्विन कोब्रा, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सांरग दाभेकर याच्यां मागणीची राज्य परिवहन महामंडळाने दख्खल घेऊन येत्या १६ आगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून चिमुर आष्टी क्रांती एक्सप्रेस एस टि बस फेरी सुरु करण्यात येणार आहे. चिमुर आष्टी क्रांती एक्सप्रेस एस टि बस चिमुर मधून सकाळी ७.०० वा. व आष्टी मधून परत दुपारी १.०० वा ची वेळ आहे.


            भारतीय क्रांतिकारी संघटनेचे कैलाश भोयर,उपाध्यक्ष टेरेन्स कोब्रा,विलास मोहिनकर, नंदकिशोर अंबादे,बाबुराव दिघोरे,सुधाकर बारेकर, तालुका अध्यक्ष आरीफ वारसी,उपाध्यक्ष सय्यद नासीर अली,जावेद पठाण इत्यादींनी विशेष सहकार्य केले. चिमुर आष्टी क्रांती एक्सप्रेस एस टि बस चा जास्तीत जास्त संख्येने प्रवास्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !