मुल शहरात मुलांपेक्षा मुलींच्या जन्माचा आलेख वाढला,जनजागृतीला सकारात्मक प्रतिसाद.

मुल शहरात मुलांपेक्षा मुलींच्या जन्माचा आलेख वाढला,जनजागृतीला सकारात्मक प्रतिसाद.


एस.के.24 तास


मुल : ( नितेश मँकलवार ) शहरात मुलींचा जन्मदर वाढीची आनंदवार्ता आहे. सन २०२० २१ या वर्षात मुली १९९ तर मुले १६७ जन्माला आली असल्याची आरोग्य विभागात नोंद करण्यात आली आहे.
शासनाने लोकांमध्ये मुलींविषयी केलेली जनजागृती बघता त्याचा सकारात्मक परिणाम असल्याचे बोलले जात आहे. यात विशेष म्हणजे लिंगनिदान केले जात नसल्याने मुलीच्या जन्मदरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे व मुलांइतका मुलींचा जन्मदर वाढविणे या उद्देशाने बेटी बचाओ बेटी पढ़ाओ या योजनेच्या धर्तीवरच मुलींचा जन्मदर वाढविणे व त्यांना शिक्षण देणे आदी बाबीतन जनजागती करण्यासाठी
गर्भवती महिलांची नियमित तपासणी
उपजिल्हा रुग्णालयात वेळोवेळी गर्भवती महिलेची तपासणी करुन त्यांना मार्गदर्शन केले जाते. मुला मुलीबाबत भेदभाव न करता दोन्ही समान आहेत, हे सांगितले जाते. उलट शासनाने मुलींसाठी विविध योजना कार्यान्वित केल्या जात असल्याने भविष्यात पालकांना फायदाच होणार आहे. बाळाचे लिंग निदान करण्या पुढे धजावत नसल्याचे दिसून आले.
शासनाने महत्त्वाची पावले उचलली. त्यामुळे मुलींविषयी नकारात्मक विचारांना मूठमाती देण्यात आली. त्याचाच परिणाम मुलीचा जन्मदर मुलांपेक्षा वाढला आहे. दर हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर वाढणे शासनाला अपेक्षित आहे. शहराची लोकसंख्या २८.८०३ असन सन
२०२० २१ या वर्षात १९९ मुली तर १६७ मुले जन्मली. राज्यात कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी सुकन्या योजनेचा लाभ कायम ठेवून त्या व्यतिरिक्त मुलीचा जन्म झाल्यापासून मुलगी १८ वर्षे होईपर्यंतच्या लाभासाठी अनेक योजना शासनाने कार्यान्वित केल्या आहेत


Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !