सोनमाळा येथील जिल्हा परिषद शाळेत फुलवली परसबाग शाळेतील शिक्षकांचा पुढाकार.
एस.के.24 तास
भंडारा : (मुकेश मेश्राम)लाखनी तालुक्यातील सोनमाळा येथिल जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापकासह शिक्षकांनी शाळेत परसबाग फुलवून इतरांनासह एक नवीन संकल्प तयार करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
शाळा सुंदर व आकर्षित दिसावी व विद्यार्थ्यांचे या हिरवडी मध्ये मन प्रफुल्लित होऊन शिक्षनाचे धडे आत्मसात करत राहावे या हेतूने मुख्याध्यापक बी.एम.रामटेके यांनी परसबाग फुलवण्यासाठी सरपंच नूतन देशपांडे यांच्यासह सहाय्यक शिक्षक आणि इतर ग्रामस्थांनच्या मदतीने ही परसबाग फुलवली आहे.यासाठी शाळेच्या सर्व सदस्यांसह सरपंच, सहाय्यक शिक्षक,तंटामुक्त समितीचे पदाधिकारी,मदतनीस यांचीही मोलाची साथ लाभली.याप्रसंगी कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून मिरेगाव शाळेचे मुख्याध्यापक तथा आदर्श शिक्षक डमदेव कहालकर, सरपंच नूतन देशपांडे,मुख्याध्यापक,बी.एम. रामटेके,सहायक शिक्षक,एल.टी.बावनकुळे, सहाय्यक शिक्षिका डी.वाय,वनवे,वनिता गायधने,उर्मिला वालकर,कविता उत्तम रामटेके,तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष लोकेश देशपांडे,मदतनीस सुरेखा इटवले,विश्वनंदा मेश्राम,प्रशांत बडोले,एस.आर.चिमणकर व राजेश कान्हेकर यांसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.