वाघाचे हल्यात पुन्हा एकाचा बळी, सावली वनपरिक्षेत्राचे टेकाडी येथील घटना.

वाघाचे हल्यात पुन्हा एकाचा बळी, सावली वनपरिक्षेत्राचे टेकाडी येथील घटना.



एस.के.24 तास


सावली : वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या टेकाडी जंगलात बैल चारण्यास गेलेल्या शेतकरी धोंडू वडगू भोयर वय 65 वर्ष यास वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना दिनांक 25 जुलै रोजी उघडकीस आली आहे सततच्या वाघाच्या हल्यामुळे जनतेत भीतीचे वातावरण झाले आहे

सावली उपवनक्षेत्र टेकाडी नियतवन क्षेत्राचे कक्ष क्रमांक 305 मधील ही घटना आहे , दिनांक 24 जुलै रोजी धाडू भोयर आपले स्वतःचे बैल घेऊन चरायला जवळच्या जंगलात गेला होता . काल सायंकाळी साडे चार वाजता चे दरम्यान वाघाने त्याच्यावर हल्ला करून ठार असावे, भांबावलेले बैल घरी परत आले , मात्र धाडू परत न आल्याने त्याचा शोधा शोध घेतला असता , आज पहाटे कक्ष क्रमांक 305 मध्ये त्याचा मृतदेह आढळून आला . गावाचे नजीकच वाघाचे हल्ले होत असल्याने , शेतकरी गावकरी भयभीत झाले असून वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे . घटनास्थळावर वन विभागाचे अधिकारी हजर झाले असून मोका पंचनामा केला जात आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !