पालांदूर परिसरातील दोन महिन्यात वीजपुरवठा सुरू होणार विजवहिनीची दोन कोटी मंजूर.
एस.के.24 तास
भंडारा : (मुकेश मेश्राम) लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात गत काही वर्षभरापासून खंडित वीज पुरवठ्याचा समाना करीत जनता तसेच कर्मचारी त्रस्त झाले होते.जोराचा वादळी वारा आल्यावर वीज खंडित होत होती यामुळे वीज वितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत होते.पालांदूर येथे आसगाव येथून वीजपुरवठा केला जातो.२९ किलोमीटरची वीज वाहिनी ४८० खांबांवर चढून दुरुस्ती करायला कर्मचारी अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ येत होते.परिसरातील जनतेला रात्र अंधारात काढावी लागत होती.ही समस्या पालांदूर येथील शिष्टमंडळाने महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांना सांगितली.नवीन वीज वाहिनीसाठी मोठा खर्च अपेक्षित होता.कोरोना संकटाने निधीचा आधीच तुटवडा होता.परंतु नाना पटोले यांनी डीपीडीसी अंतर्गत एक कोटी ९० लाख रुपये मंजूर केले आहेत.लाखनी तालुक्यातील पालांदूरसह ४८ गावांतील वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी एक कोटी ९० लाख रुपयांची नवीन वीजवाहिनी मंजूर झाली आहे.या ११ किलोमीटर वीज वाहिनीचे काम प्रगतीपथावर आहे.दोन महिन्यांत वीजपुरवठा या वाहिनीवरून सुरू होणार आहे. यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.कामाला सुरुवात होऊन काम प्रगतीपथावर आहे.दोन महिन्यांत काम पूर्णत्वाला जाऊन पालांदूरसह ४८ गावांना सुरळीत वीजपुरवठा होणार आहे.