जिबगाव येथील प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या नवीन इमारतीचे लोकार्पण करा- राकेश गोलपल्लीवार यांची मागणी.
सावली : तालुक्यातील जीबगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारतीचा बांधकाम मागील 3 वर्षा पासून लाखो रूपये खर्च करुन पूर्ण करण्यात आले. मात्र अद्याप उदघाटन झाले नाही जीबगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र एका छोट्या रूम मध्ये स्थलांतरित आहे. पावसाळा सुरु होताच इमारत गळत असल्यामुळे,अपुरी जागा असल्यामुळे अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक वेळा पत्रव्यवहार केले असतांनाही दूर्लक्ष होत असल्यामुळे रुग्णाचे मोठे हाल होत आहे तरी योग्य निर्णय घेऊन प्रा.आ.केंद्राचा नवीन लोकार्पण सोहळा लवकर पार पडण्यात येऊन रुग्णाची व त्यातील कर्मच्याऱ्याची योग्य वेळी काम करण्यास मद्त करावी व त्वरित लक्ष देऊन लोकार्पण सोहळा पार पाडावा. न पाडल्यास गावकरीच उदघाटन पार पाडतील असा इशारा जीबगाव येथील ग्रा.प.सदस्य राकेश गोलपल्लीवार यांनी दिला आहे.