चामोर्शी शहरातील घरांमध्ये घुसला पाणी.
एस.के.24 तास
चामोर्शी : ( प्रशांत चुदरी ) तहसील तेथे आज दिनांक ०१/०७/२०२१ झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबेडकर वार्ड क्रमांक .६ येथे अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. तर रोडावर पाणी साचले आहे .अवघ्या एका तासाच्या मुसळधार पावसामुळे अनेकाचे भारी नुसकान झाले आहे .साचलेल्या पाण्यामुळे परिसरात घान निर्माण झाली आहे . तसेच येथील कमलबाई ढाक , लक्ष्मी काटवाले, ईश्वर वाढई , कविता गोलाईत , देवराव नैताम,सुभाष मशाखेत्री,राजु भाडेंकर,सखूबाई ढाक,भारत वैरागडे,गोपाल नदेश्वर,तुलाराम नदेश्वर,कृष्णाजी चिचघरे,सोमेश्वर आत्राम,तसेच केशव ढाक याच्या घरी नेहमी मुसळधार पावसामुळे घरात पाणी शिरत असते. यांची घरे अती जीर्ण अवस्थेत असल्या मुळे घरे पडण्याची भिती निर्माण झाली आहे.या लोकांची परिस्थीती अत्यंत गंभीर असून या लोकांन कडे घर बांधकाम करण्या इतके योग्य पैसे देखील नाही. येथील लोकांन करिता दर वर्षी करा किंव्हा मर अशी परिस्थिती निर्माण होत असते.
दर वर्षी नगर पंचायत येथे या परिस्थीती बद्दल माहिती देऊन सुद्धा लोकांना घरकुल योजनेच्या लाभ मिळत नाही .तसेच शासनाकडून कसल्याही प्रकारचि निधी मिळत नाही दुसऱ्या टप्प्याने बघीतले तर रोडच्या चुकीच्या बांधकामामुळे अशी परिस्थीती उद्भवत असते या वार्डा मध्ये रोडाच उंच बांधकाम झाल्या मुळे येथील घरे ही खालावली आहे त्या मुळे नालितील पाणी पास न होऊन तो तिथेच साचून असते त्याचं प्रमाणे त्या मुळे अनेक रोगाची लागण होऊन लोकांची .फजिती होत आहे तरी पण लवकरात लवकर प्रभाग क्रमांक 6 आणि प्रभाग क्रमांक 8 या दोन्ही वाडँ क्रमांकाची नगर पंचायत चामोशीँ चे कर्मचारी चारी येऊन पाहणी करुन गोरगरीब जनतेला न्याय मिळवून द्यावे अशी मागणी प्रभाग 6-8 याची मागणी केली जात आहे.