मुल तहसीलदार होळी यांच्या रेती घाट व रेती चोरी प्रकरणासंदर्भात भ्रष्ट कारभाराची चौकशी करून कारवाई करा. ◆ राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ सचिव संजय कन्नावार यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी.

मुल तहसीलदार होळी यांच्या रेती घाट व रेती चोरी प्रकरणासंदर्भात भ्रष्ट कारभाराची चौकशी करून कारवाई करा.


◆ राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ सचिव संजय कन्नावार यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी.




एस.के.24 तास


चंद्रपूर : मुल तहसीलदार होळी यांच्या भ्रष्ट लीला  मूल तालुक्यात सद्ध्या चर्चेचा विषय असून त्यांनी रेती घाट व्यावसायिकांकडून लाखो रुपये घेऊन शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडविला असल्याने तहसीलदार होळी यांच्यावर उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे  विदर्भ सचिव संजय कन्नावार यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.


 मूल चे तहसीलदार होळी यांच्या विषयी प्रसारमाध्यमात बातम्या प्रकाशित होत असून मूल तालुक्यातील मौजा चिंचाळा येथील जप्त केलेला रेती साठा चोरट्यांनी चोरुन नेल्या नंतर सुद्धा तहसीलदार होळी यांनी याबाबत कुठलीही चौकशी केली नाही व चोरट्यांना पकडले नाही त्यामुळे शासनाचा लाखो रुपयाचा महसूल तहसीलदार होळी हे बुडवित असून जवळपास १८ रेती घाट व्यावसायिकांकडून १ लाख महिन्याचा हप्ता वसुली व रेती घाटात जेसीबी मशीन च्या नावाखाली ७ लाख रुपये प्रत्येक रेती घाट व्यावसायिकांकडून तहसीलदार होळी घेत असल्याच्या चर्चा आहे. एवढेच नव्हे तर एका रेती घाटात त्यांची पार्टनरशिप सुद्धा असल्याचे बोलल्या जात आहे. दरम्यान मौजा मूल तालुक्यातील चिंचाळा येथील जवळपास 20 तें 22 ब्रॉस रेती चा साठा तलाठी मंडळ अधिकारी यांनी तहसीलदार होळी यांच्या आदेशाने जप्त केला पण त्यापैकी जवळपास 75 टक्के रैती साठा चोरट्यांनी चोरून नेला त्याची दीड महिना लोटून सुद्धा चौकशी करण्यात आली नाही व चोरट्यांना पकडले नाही. उलट या संदर्भात निवेदन देणाऱ्या युवकांना नोटीस देण्यात आला. त्यामुळे तहसीलदार हा पदाचा गैरवापर करीत आहे. 


तहसीलदार होळी वर का होऊ शकते कारवाई ?


भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टल वर दिनांक 3 जुलै ला बातमी प्रकाशित झाल्यानंतर त्या बातमीत असलेल्या निवेदनकर्त्याच्या नावाने तहसीलदार होळी यांनी निवेदन कर्त्याना नोटीस पाठवला जेंव्हा की त्या नोटीस वर दिनांक 28 जून ही तारीख नमूद आहे. त्यामुळे तहसीलदार होळी यांनी ज्या कॉम्पुटर वर हा नोटीस टायपिंग केला असेल त्याची चौकशी करणे आवश्यक आहे कारण तहसीलदार यासाठी जबाबदार असताना व त्यांनी या संदर्भात निवेदन देणाऱ्या युवकांना चुकीच्या पद्धतीने नोटीस देऊन सेवा कायद्याचा भंग केला आहे. शिवाय प्रसारमाध्यमांमधे रेती चोरी बद्दल बातम्या आल्यानंतर त्यांच्याकडून  पत्रकारांना नोटीस देऊन त्यांनी देऊन पदाचा दुरुपयोग केला आहे अर्थात जिल्हाधिकारी यांनी विभागीय चौकशी केल्यास तहसीलदार होळी यांच्यावर कारवाई  होऊ शकते.


तहसीलदार हे पद जनतेला न्याय मिळवून देणारे व जनतेच्या सेवेसाठी असते त्या पदावर बसणारा व्यक्ती हा सर्वधर्मसमभाव व सर्व जाती समूहाला सामान न्याय देण्याचे काम करीत असतो व तो जातीच्या खुर्चीवर नसतो पण या संदर्भात तहसीलदार यांनी चुकीच्या पद्धतीने आपल्या जातीचा गैरफायदा घेत तहसीलदार यांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात लिखाण करणाऱ्या पत्रकारांवर आपल्या जातीच्या बांधवांना समोर करून अनुसूचित जनजाती कायद्या अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली. ती प्रशासनाचा व पदाचा दुरुपयोग करणारी ठरली आहे. त्यामुळे तहसीलदार होळी हे स्वता भ्रष्टाचार केल्यानंतर हा भ्रष्टाचार उघड करणाऱ्यांना पदाचा दुरुपयोग करून त्यांना नोटीस देतात ही बाब अतिशय गंभीर असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ सचिव संजय कन्नावार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे यावेळी रासप चे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !