सोनापूर येथील ग्रामपंचायत संगणक परिचालक पदा ची नियमबाह्य भरती.
◆ भरती प्रक्रिया रद्द करा युवा कांग्रेस ची निवेदनातून मागणी.
सुरेश कन्नमवार मुख्य संपादक - एस.के.24 तास
सावली : तालुक्यातील सोनापूर ग्रामपंचायत अंतर्गत संगणक परिचालक पदाच्या भरती अनियमबाह्य असून संगणक पदा च्या भरती मध्ये घोड झालं असल्याचे गावात बोलले जाते आहे.
प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये संगणक परिचालक हे पद भरल्या जातो सोनापूर ग्रामपंचायत ने गावांमध्ये संगणक पदा करिता भरती घेण्यासाठी कोणतीही पूर्वसूचना न देता व दवंडी किंवा नोटीस बोर्ड न लावता ग्रामपंचायतीने आपल्या मर्जीने संगणक परिचालक पदाचे भरती करण्याचा प्रयत्न केला असून या पद भरती वर गावातील युवकांनी आक्षेप घेत पंचायत समिती सावली बि.डी.ओ.गावडे साहेब व सभापती विजय कोरेवार पंचायत समिती सावली.यांना युवा काँग्रेस अविनाश भुरसे व संगणक परिचालक या साठी पात्रता दाखल करीत असलेल्या युवकांनी निवेदन देऊन संगणक परिचालक पद रद्द करण्यात यावे अशी मागणी निवेदनातून केली आहे.
या पूर्वी ग्रामपंचायतच्या संगणक परिचालक पदी मुकेश भुरसे होते त्यानी ग्रामपंचायत निवडून लढली व ते निवडणूक जिंकायली आणि संगणक परिचालक पदाचा राजीनामा दिला.आणि उपसरपंच पदभार स्वीकारला त्यामुळे या ग्रामपंचायत अंतर्गत त्यामुळे सोनापूर ग्रामपंचायत च्या संगणक परिचालक पद रिक्त होते सदर पद भरण्याकरिता महाराष्ट्र शासन निर्णयनुसार पंचायत समितीकडून परिपत्रक ग्रामपंचायत ला पाठवण्यात आले त्या परिपत्रकानुसार गावामध्ये जाहीरनामा अधिसूचना दवंडी देऊन पद भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्या येणे तरतूद असताना तसे न करता पूर्ण गावभर निवेदन न लावता दोन तीन ठिकाणी लावलं जेणेकरून जास्त लोकांना माहित होऊ नये म्हणून ग्रामपंचायने दवंडी न देता गावातिल प्रत्येक निवेदन प्रत्येक चौकाचौकात लावला जातो त्या प्रकारे न लावता गुप्तता ठेऊन संगणक परिचालक पदाचा ची फॉर्म भरण्याकरिता अनेक युवकांना जाहिरात माहित झाली नसल्यामुळे मुकावे लागले आहे.मात्र ग्रामपंचायत ने आपल्या हितसंबंध जोपासत एकच अर्ज आले असून त्यांच एकच अर्जदाराचा विचार करून संगणक परिचालक साठी निवड झालेअसल्याची चर्चा गावात सुशिक्षित बेरोजगारांना माहित होताच गावात खळबळ माजली.
आपल्याजवळील व्यक्तीचा नाव मासिक सभेमध्ये निवड करण्यात आले सदर निवडप्रक्रिया गावांमध्ये प्रसिद्धी परिपत्रक दवंडी लावून न केल्यामुळे युवकांमध्ये नाराजगी व्यक्त करीत गावातील नागरिकांनी संगणक परिचालक पद भरती संदर्भात ग्रामपंचायत ला विचारणा केली असता भरतीची वेळ गेलेली असून आम्ही दुसऱ्याचा अर्ज स्वीकारणार नाही अशा पद्धतीचे उत्तर ग्रामपंचायतीने दिलेले आहे .
त्यामुळे सोनापुर ग्रामस्थ नाराजगी व्यक्त करीत असून उच्चशिक्षित. बेरोजगार असलेल्या अनेक पदवीधारकांना संगणक परिचालक या पद भरतीपासून मुकावे लागेल की काय असा प्रश्न उपस्थित झाले.
संगणक परिचालक पदाच्या भरती संदर्भात प्रसिद्धी पत्रके गावभर लावून गावात दवंडी देऊन इच्छुक येणाऱ्या उमेदवाराचे अर्ज स्वीकारून त्यातील योग्य पात्रता असलेल्या उमेदवाराची निवड करण्यात यावी . आणि नियमबाह्य पद्धतीने घेतलेल्या अर्ज रद्द करण्यात यावे यासंदर्भात युवा काँग्रेस यांच्या नेतृत्वात पंचायत समिती बी.डी.ओ.गावंडे साहेब.पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांच्या कडे निवेदन देऊन पदभरती संदर्भात चर्चा करण्यात आली असता हे नियम बाह्य भरती रद्द करून मुदत वाढ देऊन पुन्हा गावात प्रसिद्ध करून सुशिक्षित बेरोजगार यांच्याकडून अर्ज मागविण्यात येणार असल्याचे बि.डी.ओ.यांनी सांगितले.
निवेदन देताना युवा काँग्रेस अविनाश भाऊ भुरसे.डोमाजी शेंडे. विकेश भांडेकर. प्रीतम बांबोडे. तलाश गोवर्धन आदी अनेक युवक उपस्थित होते.
संगणक परिचालक पदासाठी तीन-चार ठिकाणी परिपत्रक लावलेले होते मात्र एकच अर्ज आल्यामुळे त्याच उमेदवारा च विचार करण्यात येईल आणि त्याचीच निवड करण्यात येईल त्यामुळे आम्ही अर्ज घेणार नसून पंचायत समितीने अर्ज घावे.
मुकेश भुरसे - उपसरपंच,ग्रा.सोनापूर
ग्रामपंचायत गावांमध्ये प्रसिद्धी परिपत्रके न लावता आपल्याच मर्जीने पद भरण्याचा प्रयत्न चालवला होता अनेक सुशिक्षित बेरोजगार या पद्भरती संदर्भात माहिती वंचित राहिले त्यामुळे संगणक परीचालक पदाकरिता दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी देण्यात येत असून पुन्हा अर्ज मागविण्यात येणार आहे संगणक परिचालक पद भरण्याचा ग्रामपंचायतला कोणताही अधिकार नाही.
- विजय कोरेवार सभापती,पंचायत समिती - सावली