मामा तलावात मगर- सुशी दाबगावात बघ्याची झुंबड
एस.के.24 तास
मुल : ( नितेश मँकलवार ) बघण्यासाठी गावातील नागरिकांची मोठी भीड मुल तालुक्यातील सुशी दाबगावं गाव नजिक असलेल्या माजी माल गुजारी तलावात छोटासा ५ फुटाचा मगर मिळाला असून त्याला बघण्याकरिता गावातील व पटिसर्तील नागरिकांनी बघण्याकरीता मोठी गर्दी केलेली होती.
सविस्तर वृत्त असे की सुशी गावातील मामा तलावात फिश पालन होत असून येथील मासेमारी समाज नेहमीच मासे मारीत असतात. व पावसाळा आला की मास्याची बिजाई सोडत असतात. तोच सकाळी तलावात तील बिजई काढण्याच्या दृष्टीने तलावात जाळे पसरवले तर त्यांना मगर दिसून आला. काहींनी तर मोठी मासे असावें असे वाटले परंतु काठाला येताच मगराची पुष्टी झाली आणि त्यास पकडून वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले. सदर मगर हा ताडोबा अंधारी नदीतून आला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे.