मुल - चंद्रपुर रोड वर भिषण अपघात.
एस.के.24 तास
मुल : ( नितेश मँकलवार ) शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या डोणी फाट्याजवळ दुचाकीने जात असलेल्या दोघांचा अपघात झाल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान घडली.
दुचाकीस्वार हे मुल वरून चंद्रपूर कडे तर चारचाकी वाहन बोलेरो पिकप की चंद्रपूर वरून मुलकडे येत असल्याचे कळते.मृतकाचे नाव अद्याप कळले नव्हते.
दुचाकीस्वार हे गोंडपिपरी तालुक्यातील लिखीतवाडा या गावातील असल्याची माहिती आहे.घटनास्थळी पोलिस दाखल झाले असुन पुढील तपास सुरु आहे.