दोन मद्यधुंद व्यक्तींची फिल्मी स्टाईल हाणामारी.

 दोन मद्यधुंद व्यक्तींची फिल्मी स्टाईल हाणामारी.

एस.के.24 तास


भंडारा : (मुकेश मेश्राम) दि.०६ जुलै : भंडारा शहरात भर चौकामध्ये दोन मद्यधुंद व्यक्तींची फिल्मी स्टाईल हाणामारी झाली. काम आटोपून घरी जाणाऱ्या मजुरांची फ्री स्टाईल फायटिंग पाहायला मिळाली. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या फिल्मी हाणामारीची एकच चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.

नेमकं काय घडलं

भंडारा शहरातील गांधी चौकात दोन मजूर आपले काम आटपून घरी जात होता. अचानक त्यांना दारु पिण्याची हुक्की आली. त्यानंतर दोघांनी झिंगेपर्यंत मद्यपान केले. दारु प्यायल्यानंतर घराची वाट धरत असताना अचानक त्यांच्यात आपापसात भांडण सुरु झाले. शाब्दिक वादाचं रुपांतर कधी मारामारीत झालं, याची दोघांनाही कल्पना आली नाही.

बघ्यांचे मनोरंजन

दाक्षिणात्य चित्रपटात जशी हिरो आणि गुंडांची फाईटिंग होते, तशीच हाणामारी भंडारा शहरातील चौकात गर्दी करुन उभ्या असलेल्या पादचाऱ्यांनी अनुभवली. शेवटी मध्यस्थी करत एकाने प्रकरण मिटवले खरे, मात्र त्यालाची दोघांकडून फुकटचा प्रसादही खावा लागला होता. मात्र या तळीरामांची ढिशूम-ढिशूम पाहून नागरिकांचं पुरतं मनोरंजन झालं.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !