नवीन पाण्याच्या टाकी वरुन पडले पाच कामगार.

 नवीन पाण्याच्या टाकी वरुन पडले पाच कामगार.



★ जखमी कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल.


★ नशीब बलवत्तर म्हणून कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.


एस.के.24 तास


सावली : ( सुरेश कन्नमवार ) शहरात मागील एक वर्षांपासून जिवन प्राधिकरणाच्या फिल्टर पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरु करण्यात आले. या टाकीचे बांधकाम मोठे असून या टाकीच्या पाण्याची क्षमता जास्त आहे. मात्र आज दि. १४ जुलै ला ला दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास पाण्याच्या टाकीचे आतल्या बाजुचे बांधकाम करत असतांना बांधलेला जुगाड तुटला आणि पाच कामगार आतल्या बाजूला खाली पडून जखमी झाल्याची घटना घडली.


या कामगारांचे नाव घनश्याम नारायण खोब्रागडे (वय ५०) अमोल गौतम खोब्रागडे (वय २५ ), जयपाल अरुण गेडाम ( वय २१ ) , पवन विजय गावतुरे (वय ३०) , विनोद प्रभाकर कोवे ( वय २८ ) अशी जखमी झाले आहेत. नशीब बलवत्तर म्हणून कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. जखमी कामगारांना ग्रामीण रुग्णालय सावली येथे तातडीने उपचारासाठी भरती करण्यात आले. पण तेथील कामगारांना ठेक्केदाराकडून कुठली सुरक्षा किट दिलेली नाही. वृत्त लिहतस्तोवर पाच कामगारांना रुग्णालयात नेण्यात आले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !