महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या मागणीची घेतली दखल.

 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या मागणीची घेतली दखल.



एस.के.24 तास

भंडारा : (मुकेश मेश्राम) दि.०२/०७/२०२१ ला म.रा.प्राथ. शिक्षक संघ भंडाराच्यावतीने मा.मुबारक सैय्यद जिल्हाध्यक्ष,यांच्या नेतृत्वात व मा सुनिलभाऊ मेंढे खासदारसाहेब,मा.परिणय फुके आमदारसाहेब यांच्या उपस्थितीत प्रशासनाने आंदोलनाला परवानगी नाकारल्यामुळे आपल्या बांधवांच्या मागण्या पूर्ततेसाठी मा.जिल्हाधिकारी साहेब भंडारा यांची प्रत्यक्ष भेट घेण्यात आली असता जिल्हाधिकारी साहेबांच्या कक्षात  तात्काळ मा.मुख्यकार्यकारी अधिकारी साहेब ,शिक्षणाधिकारी साहेब जि.प.भंडारा हे उपस्थित झाले .मा.जिल्हाधिकारी साहेबांसमोर मा.मुबारक यांनी संघाच्या निवेदनाप्रमाणे मागण्या मांडल्या.त्यात अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेले वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणीची प्रकरणे येत्या पंधरा दिवसात निकाली काढण्यसंबंधाने मागणी करण्यात आली.तसेच विषयशिक्षक, उच्चश्रेणी मुख्याध्यापक,केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांची रिक्तपदे भरण्याबाबतची कार्यवाही लवकरात लवकर करण्यात यावी,वैद्यकिय प्रतिपुर्तीची प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यासंबंधाने कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.या व इतर सर्व मागण्यासंबाधाने मा.मुख्यकार्यकारी अधिकारी साहेब, शिक्षणाधिकारी साहेब यांनी तात्काळ कार्यवाही करतो असे सांगितले. मा.मु.का.अ.यांनी ८ जुलैपर्यंत म.रा.प्रा.शि.संघाच्या मागणीप्रमाणे संघटनांच्या पदाधिकारी यांची सभा लावून सर्वच मागण्यांचा निपटारा करण्यात येईल असे सांगितले,तेव्हा दिलेल्या अवधीमध्ये कारवाही झाली नाही  तर विधानपरिषदेत संघाच्या सर्व मागण्यासंबाधाने आवाज उठवणार असे.मा.परिणय फुके साहेबांनी स्पष्टपणे सांगितले.

शिक्षक उपस्थिती शिक्षक शाळेत १० ते ३ या वेळेत ५०% प्रमाणे उपस्थित राहतील असा लगेच पत्र काढून पं.स.ला पाठविण्यात येईल असे सांगितले.              

 (पत्र संघाच्या पदाधिकारी यांच्या समोर काढण्यात आला.)

मुबारक यांनी online. शिक्षण खेडेगावात तांत्रिक अडचणीमुळे शक्य नसल्यामुळे ५०% विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून आम्ही शिकवायला तयार आहोत असे विचार मांडले असता मा.जिल्हाधिकारी साहेबांनी शासन निर्णयानुसार तसे करता येणार नाही असे म्हटले.

   संघाच्या मागण्या : - 

१) वरिष्ठ श्रेणी/निवडश्रेणी प्रकरणे तात्काळ निकाली काढणे.

२) अतिरिक्त असलेल्या समाजशास्त्र विषय शिक्षकामध्ये B.sc अर्हता धारक शिक्षकांना विज्ञान शिक्षक म्हणून पदस्थापना देण्यात यावी.

३)दि. २८ जुन २१ पासून शाळा सुरू झाल्याने व सेतू (ब्रिजकोर्स) ४५ दिवसांत राबविणे अनिवार्य असल्याने कोविड १९ अंतर्गत अधिग्रहित केलेल्या सेवा तात्काळ प्रभावाने रद्द करणे.

४)जि.प.भंडारा अंतर्गत प्राथमिक शिक्षण विभागातील रिक्त असलेली सर्व संवर्गाची पदे तातडीने पदोन्नतीद्वारे भरण्याबाबत.

५)उन्हाळी सुटीत कोरोना कामगिरीवर असलेल्या शिक्षकांना बदली रजा म्हणून अर्जित रजेची नोंद सेवापुस्तकात घेणेबाबत.

६)दीर्घ कालावधिपासून प्रलंबीत असलेल्या वैद्यकीय देयके निकाली काढून तरतूद मंजूरीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणे.

७) सन २००५ पूर्वी शासन सेवेत रूजू झालेल्या पदार्थ

शिक्षकांच्या बेतनातून कपात करण्यात आलेली Dcps योजनेअंतर्गत ची रक्कम शासन निर्णयानुसार संबंधितांच्या भ.नि.नि.निधी खात्यावर जमा करणेबाबत तसेच सहावे वेतन आयोगामधील दोन हप्त्यांची रक्कम खात्यावर जमा करणे

९)अंशदायी पेंशन योजनेअंतर्गत शिक्षकांची सातव्या वेतन आयोगाचे दुसरे व तिसऱ्या हप्त्यांची रक्कम जुलै २१ मध्येच रोखीने मिळण्याबाबत.

  शिष्टमंडळात सर्वश्री संजिव बावनकर अध्यक्ष शि.सोसा.

भंडारा,सुधीर वाघमारे जिल्हासरचिटणिस,दिलिप बावनकर, शंकर नखाते, अनिल गयगये, राजन सव्वालाखे,नामदेव गभने, दिनेश घोडीचोर,प्रकाश चाचेरे, (संचालक) ,सुरेंद्र उके ,कैलास बुद्धे, अरविंद बारई,निशिकांत बडवाइक,सुधीर माकडे,महेश गावंडे,राधेश्याम आमकर,भाष्कर खेडीकर,रमेश लोणारे,शरद भाजीपाले,रोशन कराडे, दिगांबर जिभकाटे, हेमराज नागफासे,सुरेश हर्षे,दशरथ जिभकाटे, कोमल चव्हाण, उत्तम कुंभारगावे, गॊरीशंकर वासनिक, ईश्वर निकुडे, अविनाश निखाडे, वनवास धनिस्कर,तुलशी हटवार,रामप्रकाद वाघ,वसंत काटेखाये, वसंत केवट,रामरतन भुरे, मधुकर लेंडे, दिनेश खोब्रागडे,प्रकाश वैरागडे, सुनिल शहारे,धोंडीराम हाके,राजू लांजेवार आणी संघाचे अनेक शिलेदार उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !