ब्रम्हपुरी मध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालयावर विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा.
ब्रह्मपुरी : (उपसंपादक - विवेक खरवडे ) "विद्यार्थी कृती समिती ब्रह्मपुरी व इतर विविध संघटना मार्फत विद्यार्थी आक्रोश मोर्चा चे आयोजन करण्यात आले होते या मोर्चात अनेक विध्यार्थी सहभागी झाले होते. बरोजगराना रोजगार द्या,नौकर भर्ती त्वरित करावी विविध प्रलंबित व रखडलेल्या भार्त्या त्वरित निकाली काढाव्या संपूर्ण सरळसेवा पदे mpsc मार्फत घ्यावे,शिक्षक भर्ती,पोलीस भरती,प्रलंबित विद्युत सहायक भरती,महापारेषण भर्ती त्वरित कराव्या ,ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण करून MIDC ची स्थापना करावी,आमदार,खासदार यांचे वेतन व भत्ते कमी करून बेरोजगारांना भत्ता देण्यात यावा अश्या विविध मागण्यांसाठी आज दुपारी 12 वा. आवाज दो,हम एक है,रोजगार आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा,बबलीचे बाबा काय म्हणते,बेरोजगार नवरा नाही म्हणते असे विविध नारे देत विध्यार्थ्यानचा मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला.या मोर्च्या च्या माध्यमातून केंद्र सरकार व राज्य सरकार विरुद्ध रोष दिसून आला.नौकर भर्ती न केल्यास विदयर्थ्यांच्या असंतोषाचा बॉम्ब केव्हाही फुटू शकतो,असा इशारा यावेळी विद्यार्थ्यांनी दिला.