तालुका सरपंच सेवा संघाचे गावातील स्ट्रीट लाइट बिल न भरण्यास विरोध.
भंडारा : (मुकेश मेश्राम)लाखनी तालुक्यातील सन २०१८ पासून अनेक ग्रामपंचायतीवर लाखो रुपयांचे विजवितरण कंपनीने अचानक पावसाळ्याच्या दिवसात लाखनी तालुक्यातील जवळपास २५ ग्रामपंचायतीच्या विजपुरवठा खंडीत करुन गावांत अंधार पसरविला आहे.रस्त्यावरील विजदिव्यांचा विद्युत खर्च भागविण्यासाठी १०० टक्के अनुदान व ग्रामीण पाणीपुरवठा वरील खर्च ५० टक्के हे स्थानिक संस्था व पंचायतीराज संस्था यांना नुकसान भरपाईसाठी देणे आवश्यक असून लेखाशिर्ष शक्ती ०४ ला दर्शविणे असे शासनाचे निर्देश आहे.रस्त्यावरील विजेच्या दिव्यांची विज बिलांची रक्कम देण्यासाठी ग्रामपंचायतीला १०० टक्के अनुदान अजूनपर्यंत शासनाने ग्रामपंचायतीला अनुदान दिले नाही.ग्रामपंचायतीकडील पथदिव्यांवरील विज थकबाकीचे व्याज व दंड ३१ मार्च २०१८ पर्यंत कमी करुन ग्रामविकास विभागाने विद्युत वितरण कंपनीला जमा करावे असे स्पष्ट निर्देश असतांना सुध्दा शासनाने पथदिव्याच्या विजबिलाची रक्कम भरले नाही.इतकेच नव्हेतर केंद्र सरकार कडून ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधितील जिल्हा परिषदेने दहा टक्के व पंचायत समितीने १० टक्के रक्कम कपात करुन सुध्दा ग्रामीण भागातील जनतेला अंधारात आपले जीव धोक्यात घालावे लागते.याच पार्श्वभूमीवर लाखनी तालुका सरपंच सेवा संघ मार्फत खंड विकास अधिकारी यांची या विषयावर चर्चा करण्यात आली.खंड विकास अधिकारी यांनी सर्व सरपंच लोकांनी 15 वित्त आयोग मधून वीजबिल भरावे असे सांगितले.मात्र वित्त आयोगाची निधी फार कमी प्रमाणात मिळते व त्यातील 10 टक्के निधी ही जि.प.आणि प.समितीला 10 टक्के निधी जाते हा सुद्धा मोठा अन्याय होत आहे.यामुळे विद्युत बिल भरणे शक्य नाही.अशी भूमिका तालुका सरपंच संघटनेने घेतली वेळोवेळी नवनवीन परिपत्रक काढून ग्रामपंचायतीवर अन्याय सरकार करीत आहे.तसेच ग्रामपंचायत मधील ऑपरेटरचे सुद्धा मानधन यातूनच द्यावे लागते अश्या वेळेस बाकीच्या गावातील महत्वाचे काम होत नाही.विशेष म्हणजे विद्युत कर फक्त 35 ते 40 रुपये घेतला जातो या मध्ये लाईट सुद्धा येत नाही मग लोकांच्या रोषाला सरपंचला समोरो जावे लागते.अशी भूमिका तालुका सरपंच संघाने बीडीओ जाधव साहेब यांना सांगितले. या प्रसंगी म.व.बोळणे अध्यक्ष सरपंच सेवा संघ लाखनी धंनजय घाटबांधे,प्रशांत मसुरकर,भांडारकर,पंकज चेटूले,संगीता बारस्कर,संगीता घोनमोडे,कल्पना सेलोकर, देवानंद निखाडे,रुपचंद चौधरी,सुधाकर हटवार,परसराम फेंडेर रशिका कांबळे आदी सरपंच संघ प्रामुख्याने उपस्थित होते.