संजय गांधी निराधार योजने अंतर्गत 223 प्रकरणे मंजूर करून लाभार्थ्यांना मोठा दिलासा. - राकेश या.रत्नावार - अध्यक्ष,संजय गांधी निराधार योजना समिती
एस.के.24 तास
मुल : ( नितेश मँकलवार ) आज दिनांक 30/07/2021 रोजी तहसिल कार्यालया,मूल येथे राकेश या.रत्नावार - अध्यक्ष,संजय गांधी निराधार योजना समिती यांचे अध्यक्षतेखाली लाभार्थ्याचे प्रकरणे मंजूर करण्याकरिता सभा आयोजित करण्यांत येऊन इंदिरा गांधी विधवा योजना व संजयगांधी निराधार योजना – 43, श्रावणबाळ योजन-109 वृध्दपकाळ योजना-71, असे एकूण 223 प्रकरणे मंजूर करण्यांत आले.तसेच, विशेष अर्थसंहाय्य योजनेतील 1 कोटी 34 लाख रूपये चे वाटप करण्यांत आलेले आहे.
मूल तालूक्यातील सदर योजनेतील ग्रामीण भागातील लाभार्थ्यासाठी विशेष शिबीर आयोजीत करण्याबाबत निर्णय घेण्यांत आला. तसेच, संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ वृध्दपकाळ योजनेत ज्या लाभार्थ्यांनी अर्ज सादर केलेले आहे परंतु, सदर प्रकरणात ज्या कांही त्रृटी आहेत त्या त्रृटया तात्काळ दुरूस्त्या करून विशेष सभा आयोजित करण्यांबाबत निर्णय घेण्यांत आलेला होता. निर्णयाचे अनुषंगाने 1 महिण्यांत पुन्हा सभा घेवून लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात येऊन समिती शब्द पाळलेला आहे.
तसेच, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष श्री.राकेश या.रत्नावार यांनी जास्तीत जास्त लाभार्थ्यांना फायदा होण्यांचे दृष्टीने प्रयत्नशिल आहेत. सदर योजने संबंधाने कांही अडचणी असल्यास तहसिल कार्यालयाचे कर्मचारी यांचेशी संपर्क साधुन कागदपत्राची पुर्तता करण्यांत यावी. व दलालापासून सावधान राहावे.
तरी सदर सभेला संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष, मा.राकेश या.रत्नावार, मा.ठाकरे साहेब,नायब तहसिलदार, मा.पवार साहेब, नायब तहसिलदार,मूल मा.तुषार शिन्दे,प्रशासकीय अधिकारी,नगर परिषद,मूल तसेच, संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य श्री.दशरथ वाकुडकर, श्री.संजय गेडाम,सौ.रूपाली संतोषवार, श्री.गंगाधर कुनघाटकर,सौ.अर्चना चावरे व संजय गांधी निराधार योजनेचे संबंधित कर्मचारी श्री.गिरडकर उपस्थित होते.