लेख...
न चोर हु,न चौकीदार हु,साहब मै तो बेरोजगार हूँ !!
स्वप्नील लोणकर पुन्हा बघायचे आहेत काय ?
प्रा.लक्ष्मण मेश्राम यांच्या लेखणीतून...
एस.के.24 तास
कि आम्ही नक्षलवाद स्वीकारावा ? आणखी किती स्वप्नील लोणकर तयार झाल्यानंतर निर्लज्ज केंद्र व राज्य सरकारला जाग येईल ?
प्रश्न अनेक आहेत,समस्या अनेक आहेत पण या सुक्षित बेरोजगारांकडे लक्ष द्यायला कुणाकडेच वेळ नाही .आमच्या राज्यात बंद झालेली दारू सुरु होऊ शकते त्यासाठी आमचे मंत्री जीवाचं रान करतात पण तरुणांना रोजगार मिळण्यासाठी कुठलाच प्रयत्न नाही .केंद्र सरकारने खाजगी करणाचा विळाच उचलला आहे त्यांना शेतकरी, शेतमजूर,बेरोजगार याविषयी कुठलीच चिंता नाही स्वतःच्या बापाची जागिर असल्याप्रमाणे आहे ते सर्व विकायला निघाले आहेत .त्यापाठोपाठ आपलं राज्य सरकार सुद्धा पावलावर पाऊल ठेवून चालत आहेत. राज्यात मंत्र्यांना गाड्या घ्यायला पैसे आहेत ,घरे बांधायला पैसे आहेत परंतु नौकर भर्ती साठी मात्र यांच्या तिजोरीत खणखणाट आहे.मंत्री पदाची शपथ घेताना आपल्या मनातल्या मनात अगदी उलट शपथ घेत असतील असे मला वाटते.आज अनेक तरुण अभ्यास करून करून त्यांचे पेकाट मोडले आहेत .अनेक तरुण नैराश्याने ग्रासले आहेत मग ही मुलं आत्महत्या करणार नाही तर काय करणार. MPSC असो किंवा सरळसेवा कुठलीच परीक्षा नियमित पणे होत नाही आहे.2017 साली सुरु झालेली शिक्षक भर्ती अजूनपर्यंत रेंगाळलीच आहे,तिचा गुंता काही सुटत नाही महा टेट परीक्षा देताना एखादी महिला गरोदर असेल तर आता तिचा मुलगा चालायला खेळायला लागला असेल कदाचित तो शाळेत पण जाईल पण त्याच्या आईच शाळेत जायचं स्वप्न पूर्ण होत नाही हि आमची शोकांतिका आहे. पोलीस भरतीचहि तेच आहे आमचे अनिल देशमुख साहेब मेगा पोलीस भरती करणार असे म्हणता म्हणता स्वतः घरी चालले गेले पण पोलीस भरती काही झाली नाही .अनेक तरुण धावून धावून थकून गेले आहेत आजही अनेक तरुण पोलीस भरतीची चातका प्रमाणे वाट पाहत आहेत अनेक विध्यार्थी विचारतात कि सर पोलीस भरती केव्हा होणार आहे मी त्यांचं मनोबल खचू नये म्हणून नेहमी मी 'सांगतो अरे निघणार आता एवढ्यात तुमचं अभ्यास सुरू ठेवा वेळेवर मग तयारी होत नाही'
पण बिचारे किती काळ संयम ठेवणार ,किती वेळा विश्वास नागरे पाटलांचे व्हिडीओ पाहणार त्यालाही काही सीमा असते आणि यापैकीच काही हताश झालेले तरुण विचारात कि सर नक्षल वाद्यांच्या जागा कधी निघणार ,त्यासाठी कोणती तयारी करावी लागेल? माझा नेहमीचा प्रश्न आहे की हा हताश झालेला ,निराश झालेला तरुण बेरोजगार वर्ग नक्षलवादाकडे वळला तर काय होईल?मी तर म्हणेन की आधी या मंत्र्यांना गोळ्या झाळा ज्यांनी आमचं करिअर बरबाद केलं,ज्यांनी आमचं आयुष्य बरबाद ,लोकांच्या भरवश्यावर निवडून येऊन फक्त आपलीच घर भरली,कोरोना सारख्या संकटात सामान्य माणसाला लुटलं याना जगण्याचा अधिकारच काय? खरे तर हेच देशद्रोही आहेत . स्पर्धा परीक्षेच्या नावावर विध्यर्थ्यांची लूट करणारे चोर आहेत. जागा काढतात 200 .परीक्षेची फी असते पाचशे ते सहाशे कधी हजार पण अर्ज येतात लाखोंच्या घरात .गणित करा किती जमा करतात. आणि तेही बरोबर परीक्षा होत नाही झालीच तर पेपर फुटतो नाहीतर निवड होऊनही नियुक्त देत नाही असा हा काळा बाजार सुरु आहे.म्हणून विध्यर्थ्यानो आता जागे व्हा फक्त अभ्यास करून आता नौकरी मिळणे शक्य नाही त्यासाठी आता लढावं लागेल,संघर्ष करावा लागेल एवढेच नाही तर प्रस्थापित लोकांना सत्तेतून हाकलून अपल्याला राजकारणात सुद्धा उतरावं लागेल त्याशिवाय आता पर्याय नाही ,नाहीतर हे हरामखोर राजकारणी आपली वाट लावल्याशिवाय राहणार नाही पण मी तुम्हाला सांगतो त्यांनी वाट लावायच्या अगोदर आपण आपली वाट निवडली पाहिजे.
प्रा.लक्ष्मण मेश्राम संचालक,इन्स्पायर करिअर अकॅडमी,ब्रम्हपुरी अध्यक्ष,रोजगार संघ,तालुका ब्रम्हपुरी
मो न 9765952362