लोंढोली ग्रामपंचायत आरक्षित जागेवर कांग्रेस चे नवनियुक्त सरपंच श्री.उस्टु पेंदोर यांची अविरोध निवड.

लोंढोली ग्रामपंचायत आरक्षित जागेवर कांग्रेस चे  नवनियुक्त सरपंच श्री.उस्टु पेंदोर यांची अविरोध निवड.



एस.के.24 तास


सावली : तालुक्यातील नुकताच झालेल्या सरपंच च्या आरक्षण अभावी रिक्त असलेल्या सरपंच पदा च्या जागा आरक्षनात  नव्याने बदल करून त्यात  नवनियुक्त सरपंच घेण्यात आले. ग्रामपंचायत निवडणुक ही जानेवारी मध्ये पार पडली होती आणि लोंढोली ग्रामपंचायत वर विजय भाऊ वडेट्टीवार यांचे निकटवर्तीय   ग्रामपंचायत लोंढोली चे माजी सरपंच दिलीप  लटारे यांच्या मार्गदर्शनात काँग्रेस नी निवडणूक जिंकून ग्रामपंचायत वर काँग्रेसचा कब्जा केला परंतु लोंढोली ग्रामपंचायत मध्ये सरपंच  अनुसूचित जमाती महिला  राखीव आरक्षण आल्याने उमेदवार नसल्याने जागा रिक्त होती  मात्र  नविन आरक्षणात बदल झाल्यानंतर अनुसूचित जमाती पुरुष  असं बदल झाले व सरपंच पदी उस्टू भगवान पेंदोर यांची नवनियुक्त सरपंच पदी अविरोध निवड करण्यात आली. त्यावेळी उपस्थित उपसरपंच प्रमोद खोबे.राजीव बोदलकार.परिमल भटकर.शालिनी खोबे.गीता मडावी. शिल्पा भांडेकर.निखिता गेडाम.भारती ठाकूर.आणि माजी उपसरपंच दिलीप लटारे व ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थ होते सर्वांनी   नवनियुक्त सरपंच यांचे हार्दिक अभिनंदन केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !