तालुक्यातील रस्ते झाले खड्डेमय प्रशासनाचे दुर्लक्ष. ★ सावली तालुक्यातील हरांबा,जिबगांव, साखरी मार्गावरील रस्त्याची अवस्था अत्यंत खराब.

तालुक्यातील रस्ते झाले खड्डेमय प्रशासनाचे दुर्लक्ष.


★ सावली तालुक्यातील हरांबा, जिबगांव,साखरी मार्गावरील रस्त्याची अवस्था अत्यंत खराब.


एस.के.24 तास


सावली : तालुक्यातील सिन्दोळा ते हरांबा लोंढोली, जिबगाव,साखरी मार्गावरील रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून डांबरीकरण अनेक ठिकाणी उघडले आहे.  

या मार्गावरील मोठे खड्डे धोकादायक ठरत आहेत. यामुळे या मार्गावरून जाताना अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.सावली येथे बँका, शाळा,महाविद्यालये,पतसंस्था,पशुवैद्यकीय दवाखाना,बाजारपेठ अन्य शासकीय कार्यालये सावली येथे असल्याने हरांबा,उपरी,सिर्सी, कढोली,डोनाळा,जीबगाव,साखरी या गावातील लोकांची सावलीला दररोज ये-जा असते. तसेच रात्री व दिवसा मोठ्या प्रमाणात वाहनाची रेलचेल सुरू असते.सावली तालुक्याला जोडणारा हा रस्ता गावांसाठी मुख्य मार्ग असल्याने दुचाकी-चारचाकी या मार्गे जास्त प्रमाणात जात येत असतात.मागील वर्षी थाथुरमातुर खड्डे भुजवण्याचा काम हातात घेण्यात आले पन एका पाऊसातच खड्डे मय रस्ता झाले असुन आता नूतनीकरण नाहीतर कमीत कमी खड्डे तरी बुजवावीत ही मागणी वाहन धारक करत आहेत. तयार झालेल्या रस्त्याची दुरुस्ती तर दूरच पण साध्य खड्डे सुद्धा बुजवले जात नाहीत. त्यामुळे रस्त्यावर खड्डयाचे साम्राज्य झाले असून रस्त्यांवर दुरवस्था झाली आहे.रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण उघडले असून दोन ते तीन फुटाचे पसरट खड्डे पडले आहेत. 

मात्र या मार्गावर मोठे खड्डे पडले असून वाहन चालकास वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते रस्त्याची एवढी दुरवस्था झाली आहे तेव्हा प्रशासनाने नागरिकांची तालुका स्थळी येण्याकरिता होणारी फरपट थांबवावे अशी मागणी जोर धरत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !