शेतकऱ्यांना फसविणे बंद करा खा.सुनील मेंढे यांचा इशारा

शेतकऱ्यांना फसविणे बंद करा खा.सुनील मेंढे यांचा इशारा

एस.के.24 तास


 

भंडारा : (मुकेश मेश्राम) भारतीय जनता पार्टीच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्याना घेऊन आज पणन अधिकारी कार्यालयाला “ताला ठोको आंदोलन” करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना खा.मेढे म्हणाले आता शेतकऱ्यांची दिशाभूल करून राजकारण केले जाऊ शकत नाही. शेतकऱ्यांना गरज असताना जर मदत मिळत नसेल तर शेतकरी नेते म्हणून मिरविण्याचा अधिकार तुम्हाला नाही. सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या आघाडी सरकारने शेतकऱ्यांना फसविणे बंद करावे, नाही तर भविष्यात आंदोलनाची तीव्रता आणखी वाढेल असा इशारा खासदार सुनील मेंढे यांनी दिला. 

दिल्ली, मुंबई आणि नागपूरात बसून शेतकऱ्यांची व्यथा समजू शकत नाही . आज पर्यंत शेतकऱ्यांची दिशाभूल करून, शेतकरी नेते म्हणविणार्‍या जिल्ह्यातील नेत्यांनी राजकारण केले. स्वतःला भूमीपूत्र म्हणतात मात्र शेतकऱ्यांचे हित जोपासता येत नाही.. केवळ मोठ्या मोठ्या गोष्टी केल्याने शेतकऱ्यांचे दुःख दूर होत नाही असा टोलाही खा. मेंढे यांनी यावेळी आघाडी सरकारमधील नेत्यांना लावला.

हे सरकार  शेतकऱ्यांना त्यांचे अधिकार देण्यास  असमर्थ ठरीत आहे. आज पेरणीची कामं सुरू आहेत. पण शेतकऱ्यांच्या बोनसचा पैसा त्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची होणारी लूट थांबायला तयार नाही. या खरेदीत काही जण भ्रष्टाचार करून स्वतःचे हित साधत आहे. अशावेळी आम्ही खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून, कोणत्याही केंद्रावर गैरप्रकार होत असेल तर शेतकऱ्याने हिमतीने जाऊन त्याचा विरोध करावा असे आवाहनही खा. सुनील मेंढे यांनी केले. कोरोना काळात अपयशी ठरलेले हे सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीतही बेजवाबदार असल्याचे सिद्ध झाले आहे. आजचे हे आंदोलन सूचक असून भविष्यात याची तीव्रता वाढेल असेही यावेळी त्यांनी सांगितले. आमदार परिणय फुके आणि अन्य नेत्यांनी ही यावेळी मार्गदर्शन केले.

भाजपाचे जिल्हाध्यक्ष शिवराम गिरेपुंजे, आ. परीणय फुके, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष अविनाश ब्राह्मणकर,प्रदीप पडोळे,ब्रम्हानंद करंजेकर,चैतन्य उमाळकर, हेमंत देशमुख,विलास काटेखाये,महेंद्र निंबार्ते, राजेश बांते,तिलक वैद्य, कोमल गभने,नेपाल रंगारी, रेखाताई भाजीपाले,मुन्ना भाऊ पुंडे, वामनराव बेदरे, डॉ. सुदाम शहारे,संजय  कुंभलकर  सर्व तालुकाध्यक्ष यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !