ऑनलाइन गेम च्या नादात युवकाची आत्महत्या.
चिमुर : शंकरपुर येथून जवळच असलेल्या झरी येथील ऑनलाइन गेम च्या नादात बावीस वर्षीय एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना घटना बुधवारी सांयकाळी घडली आहे विकास जगदेव गजभे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून तो आपल्या कुटुंबासोबत झरी येथे राहत होता आई-वडील शेतकरी असून आई वडिलांनी एक छोटेसे किराणा दुकान गावातच टाकून दिले होते, तो ते दुकान चालवीत होता परंतु या मुलाला ऑनलाइन गेम खेळण्याचा नाद लागला या नादात तो हजारो रूपये हारला त्यामुळे पुन्हा ऑनलाइन गेम खेडण्यासाठी पैसे लागत असल्याने काल त्यांनी आपल्या बऱ्याच मित्रांना फोन करून पैशाची मागणी केली होती त्यातील एक दोन मित्रांनी त्याला पैशाची मदत केली आहे मित्राने दिलेले पैसे हरल्यामुळे तो निराश झाला होता त्यातच त्यांनी फाशी लावून आत्महत्या केली आई वडील भाऊ हे सर्वजण सकाळी शेतावर कामासाठी गेले होते घरी फक्त आजी आणि आजोबा होते सायंकाळचे सहा वाजले तरी मुलगा आपल्या खोलीतून बाहेर का आला नाही म्हणून आजोबा पाहायला गेले असता हा युवक फाशी लावून होता आजोबा ने आरडाओरड करून गावातले लोक जमा केल्या लगेच गावातील लोकांनी त्याला काढून शंकरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले होते तिथे त्याला मृत घोषित केल्यानंतर शवविच्छेदनासाठी काल रात्री चिमूर येथे नेण्यात आले आहे शंकरपूर पोलिसांनी गुन्हा नोंद केला असेल अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विनोद जांभळे करीत आहे.