येत्या दहा दिवसात कामगारांचा प्रश्‍न मार्गी न लागल्यास सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाला कुलूप ठोकून निषेध दर्शविण्यात येईल. ◆ जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांची चेतावणी.

येत्या दहा दिवसात कामगारांचा प्रश्‍न मार्गी न लागल्यास सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाला कुलूप ठोकून निषेध दर्शविण्यात येईल.


◆ जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांची चेतावणी.


एस.के.24 तास 


चंद्रपूर : सविस्तर वृत्त असे की आज दिनांक - १९/०७/२०२१ रोजी सहाय्यक कामगार आयुक्त  कार्यालय येथे गोंडपिपरी नगरपंचायत अंतर्गत काम करीत असलेल्या कामगारांन संदर्भात याआधी देखील वारंवार कामगारांची होत असलेल्या पिळवणूकीबाबत व कामगारांना किमान वेतनानुसार वेतन मिळत नसल्याबाबत वारंवार या कार्यालयात पत्रव्यवहार करून देखील अद्याप कुठलीही दखल न घेतल्यामुळे कामगारांचे ज्वलंत प्रश्न आजही प्रलंबित असतांना देखील कंत्राटदाराने कुठल्याही प्रकारचे सूचना पत्र न देता ५ कामगारांना कामावरुन काढून टाकल्याने आज परत स्मरण पत्रांचे स्मरण पत्र देऊन येत्या दहा दिवसांमध्ये काढलेल्या  कामगारांना परत कामावर न घेतल्यास व कामगारांच्या प्रलंबित मागण्या निकाली न लावल्यास कामगार सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयास कुलूप ठोकून निषेध दर्शविण्यात येईल  अशी चेतावणी युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांनी थेट कार्यालयात जाऊन निवेदनाद्वारे दिली. 


गोंडपिपरी नगरपंचायत येथील कामगारांचे आंदोलन

यशस्वीरीत्या पूर्ण झाले कारण नगरपंचायत तथा कामगार

विभाग यांनी लेखी स्वरूपी सर्व मागण्या मान्य केल्या व

उपोषण समाप्त करण्यात आले परंतु या घटनेला तीन

महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून देखील लेखी स्वरूपी 

मान्य केलेल्या मागण्या अजून पर्यंत नगरपंचायत तथा

नगरपंचायत अंतर्गत काम करीत असलेले सफाई कंत्राटदार 

यांनी पूर्ण केल्या नसल्याने नेमका महाराष्ट्र शासनाचा कामगार विभाग हा कशासाठी आहे असा सवाल सुरज ठाकरे यांनी सहाय्यक कामगार आयुक्त यांना  केला आहे.

व कामगारांच्या हिताचे रक्षण व कामगार कायद्याचे संरक्षण हा दृष्टीकोन लक्षात घेऊन महाराष्ट्र

शासनाने या विभागाची स्थापना केली आहे. परंतु जर या

विभागाच्या माध्यमातून कामगार कायद्यांचे व कामगार

हितांचे रक्षण होत नसेल तर या विभागाला कुलूप का ठोकू 

नये यासाठी म्हणून आज कामगार विभाग महाराष्ट्र शासन

यांना निवेदन देण्यात आले. येता  दहा दिवसांमध्ये प्रलंबित

मागण्या पूर्ण न केल्यास सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रपूर

यांच्या कार्यालयाला कुलूप ठोकून. आंदोलन करण्यात

येईल असा धमकीवजा इशारा श्री. सुरज ठाकरे यांनी या  निवेदनामध्ये दिला

आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !