अपुऱ्या पावसामुळे रोवणी खोळंबली, आसोला मेंढा तलावातील पाणी सोडून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा - राकेश गोलेपल्लीवार
मागील वर्षीप्रमाणे या वर्षी पावसाने दडी मारल्याने जीबगांव क्षेत्रात अनेक शेतकऱ्याची रोवणी खोळंबली असून काही शेतकऱ्यांचे परे मरण्याच्या तारणीस आले असून आसोला मेंढा नहरातील पाणी सोडून शेतकऱ्याना दिलासा द्यावा अशी मागणी जीबगांव येथील तंटामुक्ती अध्यक्ष तथा ग्रा.प.सदस्य राकेश गोलेपल्लीवार यांनी केली आहे.
मागील आढवड्यात नियमित पाऊस आल्याने शेतकऱ्याने रोवणीस सुरुवात केली पण पावसाने दडी मारल्याने सिरसी,साखरी,लोंढोली,जांब बूज,केरोडा, रयतवारी,चक पेडगांव,कोंडेखल आदी गावातील रोवणी खोळंबली आहे.आज येणार-उद्या येणार पाऊस या अपेक्षेने शेतकरी पावसाची वाट पाहू लागला पण त्याला निराशेच्या पलीकडे काहीच मिळत नाही, तर साखरी लोंढोली व हरांबा या गावात आसोला मेंढा येथील पाणी मिळत नसल्याने त्यांना निसर्गावरच अवलंबून राहावे लागत आहे.करीता पाणी सोडुन शेतकऱ्याना दिलासा द्यावा अशी मागणी ग्रा.प.सदस्य राकेश गोलपल्लीवार यानी केले आहे