अखेर त्या सहा कामगारांना आठ दिवसाच्या आत मध्ये कामावर न घेतल्यास परिणाम वाईट होतील असा सुरज ठाकरे यांचा कंपनी प्रशासनाला इशारा.

अखेर त्या सहा कामगारांना आठ दिवसाच्या आत मध्ये कामावर न घेतल्यास परिणाम वाईट होतील असा सुरज ठाकरे यांचा कंपनी प्रशासनाला इशारा.



एस.के.24 तास


चंद्रपूर : सविस्तर वृत्त असे की सन २०१९ मध्ये ए. सी. बी इंडिया लि मी पांढरपोवनी ( आर्यन कोल वॉशरिज) कंपनीने अंदाजन ३७ ते ४० कामगार कामावरून कमी केले होते. कमी केलेल्या कामगारांना परत कामावर सामावून घेण्याबाबत कंपनीने आश्वासन दिले होते. पण कंपनीने ६ कामगारांना जाणीवपूर्वक कामावर न घेता बाकी काढलेल्या सर्व कामगारांना परत  कामावर सामावून घेऊन बाकी ६ कामगारांवर अन्याय केला. अखेर ६ कामगार आपल्या न्याय व हक्कासाठी दारोदार भटकून निराश झाल्यानंतर युवा स्वाभिमान पार्टी चे जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांच्याकडे न्याय मागण्यास आल्या नंतर सूरज ठाकरे यांनी कामगारांवर होत असलेल्या पिळवणूकी कडे गांभीर्याने लक्ष देत तात्काळ संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करून तथा आज दिनांक- १४/०७/२०२१ ला मा. आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याशी भेटून त्यांनाही या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सांगितले व कंपनी प्रशासनाशी चर्चा करून या ६ कामगारांना परत कामावर घेण्यास सांगितले. सदर कामगार स्थानिक असून आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागृत असल्याने  कंपनी जाणीवपूर्वक कामगारांना कामावर घेत घेत नव्हती. याच कंपनीमध्ये जय भवानी कामगार संघटनेची सण २००९ मध्ये संस्थापक अध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांची युनियन होती. त्यावेळी येथील सर्व कामगारांना सुरज ठाकरे यांनी आव्हान दिले होते की  कामगारांवर कंपनी प्रशासनाकडून झालेला कुठलाही अन्याय जय भवानी कामगार संघटना खपवून घेणार नाही!

 म्हणून आज सुरज ठाकरे यांनी कंपनी प्रशासनाला निवेदनाद्वारे या ६ कामगारांना येत्या आठ दिवसाच्या आत कामावर न घेतल्यास परिणाम वाईट होतील इशारा दिला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !