चंद्रपुरातील रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये महिलेच्या वेशात आलेल्या युवकाने केला गोळीबार.

 चंद्रपुरातील रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये महिलेच्या वेशात आलेल्या युवकाने केला गोळीबार.



एस.के.24 तास


चंद्रपुर - चंद्रपूर शहरातील गजबजलेल्या परिसरातील रघुवंशी काम्पलेक्स या बिल्डिंग मध्ये बुरखा घालून आलेल्या युवकाने एका युवकावर गोळीबार केल्याची थरारक घटना आज दुपारी घडली.


यात एक युवक जखमी झाला आहे, त्याला पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.


या घटनेत बल्लारपूर निवासी आकाश गंधेवार जखमी झाला आहे, जखमीला उपचारासाठी नागपूर नेल्याची माहिती मिळाली असून घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी नांदेडकर व पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे व चमू दाखल झाले असून घटनेचा तपास करीत आहे. सदर गोळीबार प्रकरण गैंगवॉरशी निगडित असल्याची चर्चा आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !