शेतकऱ्यावर विज पडून दोन जण जागीच ठार.
एस.के.24 तास
मुल : (नितेश मँकलवार) वीज पडून दोन शेतकरी ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज मूल तालुक्यातील बोंडाळा गावात घडली.विलास केशव नागापुरे (५०) व गयाबाई पोरटे (६०) असे दुर्दैवी मृतकाचे नांव आहे.
आज दुपारी तीन वाजताचे दरम्यान तालुक्यात जोरदार पाऊस पडला यात वीज पडल्याने बोंडाळा येथील दोघाचे जागीच निधन झाले.
या घटनेमुळे परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.