शेतकऱ्यांच्या समस्यांकरिता भाजपाचे २ जुलै ला "ताला ठोको आंदोलन"
◆ शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे भाजपाचे आवाहन.
एस.के.24 तास
भंडारा : (मुकेश मेश्राम) जिल्ह्यात धान खरेदी केंद्रांवर गैरप्रकार आणि गैरव्यवहार होतांना दिसत आहेत. धान खरेदी केंद्र सुरु करण्यास आधी सरकारकडून विलंब झाला. जेमतेम धान खरेदी केंद्र सुरु झाले आणि बंदही झाले. अनेक शेतकऱ्यांच्या धानाची उचल झाली नाही. त्यामुळे धान खरेदीसाठी मुदतवाढ मिळावी. मागील बोनस मिळाला नाही. नियमित कर्जधारकांना घोषित केलेले पन्नास हजार अद्याप मिळाले नाहीत, तसेच इतर समस्यां शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. त्यामुळे चिंतातुर शेतकऱ्यांच्या समस्यांना घेऊन *भाजपाच्या वतीने मा माजी मंत्री डॉ परिणय फुके, मा खासदार सुनील मेंढे, जिल्हाध्यक्ष शिवराम गिऱ्हेपुंजे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अविनाश ब्राह्मणकर, यांच्या नेतृत्वात दिनांक २ जुलै २०२१ ला सकाळी ११ वाजता जिल्हा पणन अधिकारी गणेश खर्चे यांच्या कार्यालयाला टाला ठोको आंदोलन उभारले आहे.* आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपाच्या वतीने करण्यात आले. सदर आंदोलनाकरिता धारगाव जिल्हा परिषदेची नियोजन बैठक भाजपा जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र निंबार्ते, धारगाव जिल्हा परिषद सर्कल प्रमुख रमेश चावरे, माजी जिल्हा परिषद सदस्य नीलकंठ कायते, शक्ती केंद्र प्रमुख शंकर लोले, ओमप्रकाश गिऱ्हेपुंजे, मंगेश निंबार्ते, संदीप थोटे, देवचंद निंबार्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. जिल्ह्यात बारदाना उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या धान उचल करण्यास विलंब होणे किंवा केंद्र बंद राहणे यापेक्षा दुसरी शोकांतिका नसल्याचे मत अनेक शेतकऱ्यांनी मांडले, सहा महिने लोटून सरकारचे नियोजन नाही हे राज्य सरकारचे अपयश असल्याची टीका भाजपाने केली.